असेही लंके समर्थक ! सरपंच व सदस्य झाले रूग्णवाहिकेचे सारथी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

असेही लंके समर्थक ! सरपंच व सदस्य झाले रूग्णवाहिकेचे सारथी !

 असेही लंके समर्थक ! सरपंच व सदस्य झाले रूग्णवाहिकेचे सारथी ! 

भाळवणीच्या कोव्हीड सेंटरवर कार्यकर्त्यांची रूग्णसेवा : आ. लंके यांच्याकडून कौतुक पारनेर : प्रतिनिधी

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या १ हजार १०० बेडच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरामध्ये लंके समर्थक प्रामाणिकपणे रूग्णसेवा करीत आहेत. रूग्णवाहीकेवर चालक म्हणून काम करण्यास कोणी धजावत नसताना हिवरे कोरडाचे सरपंच तथा कामगार नेते दत्ता कोरडे तसेच भाळवणी ग्रामपंचायतीचे सदस्य नितिन विठठल मुरकुटे हे दोघे आ. लंके प्रतिष्ठाच्या रूग्णवाहिकेवर चालक म्हणून निःस्वार्थ तसेच प्रामाणिक भावनेतून आहोरात्र काम करीत आहेत.  

भाळवणीच्या आरोग्य मंदीरात पहिल्या चार दिवसांतच १ हजार १०० पेक्षा जास्त रूग्ण दाखल झाले. सामान्य असलेल्या रूग्णांपैकी काहींना त्रास होउ लागल्यानंतर त्यांच्या विविध चाचण्या करण्यासाठी नगर किंवा इतर ठिकाणी नेण्यासाठी कोरडे व मुरकुटे हे सज्ज असतात. मागील वर्षी कर्जुले हर्या येथे १ हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर यशस्वीरित्या चालवून तब्बल ४ हजार ०० पेक्षा जास्त रूग्णांना विनामुल्य सेवा दिल्ल्याबददल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. नीलेश लंके प्रतिष्ठाणाला एक सुसज्ज रूग्णवाहीका भेट दिली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर या रूग्णवाहीकेसाठी चालक उपलब्ध होत नव्हता. मात्र ती अडचण दत्ता कोरडे व नितीन मुरकुटे यांनी तात्काळ दुर केली. ज्यावेळी आवष्यकता असेल त्यावेळी दोघांपैकी एक तात्काळ रूग्णाला नगर किंवा इतर ठिकाणी घेउन जातात. त्यांच्या चाचण्या करून त्यांना पुन्हा आरोग्य मंदीरात आणण्याची जबाबदारीही ते समर्थपणे सांभाळतात. 

रूग्णवाहिकेचे सारथी म्हणून काम करण्याबरोबच कोरडे व मुरकुटे हे कोव्हीड सेंटरवर पडेल ते काम करण्यासाठीही आहोरात्र सज्ज असतात. आलेल्या रूग्णांची नोंदणी करणे, रूग्णांना चहा, नास्ता, जेवण देणे, स्वच्छता गृहांची सफाई करणे ही कामे ते निःसंकोचपणे करतात. आ. लंके सामान्य जनतेसाठी चोविस तास व्यस्त असतात. त्यांच्या तुलनेत आम्ही करीत असलेले काम हे नगण्य आहे. आ. लंके यांनी सामान्य जनतेसाठी असेच काम करावे, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे असू अशी ग्वाही कोरडे व मुरकुटे यांनी दिली. 


आ. लंके यांची प्रेरणा, झाले कामगार नेते 

 आमदार नीलेश लंके यांच्यासमवेत सामाजिक काम करताना दत्ता कोरडे हे राज्य परिवहन महामंडळातील कामगारांचे प्रश्‍नही मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पारनेर आगारात चालक पदावर काम करणारे दत्ता कोरडे हे आ. लंके यांच्या प्रेरणेतून कामगार नेते म्हणून पारनेर आगारात काम पाहत आहेत. कंडक्टर असलेले कोरडे यांचे सहकारी आबाजी उत्तम भोंडवे हे देखील दररोज कोव्हिड सेंटरवर रूग्णसेवा करीत आहेत.

No comments:

Post a Comment