चिचोडी पाटील ग्रामीण रुग्णालयात नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची आढावा बैठक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

चिचोडी पाटील ग्रामीण रुग्णालयात नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची आढावा बैठक

 चिचोडी पाटील ग्रामीण रुग्णालयात नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची आढावा बैठक



नगरी दवंडी

चिचोंडी पाटील (वार्ताहर) नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालय येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नगर विकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली. नगर तालुक्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण, सध्या सध्या चालू असलेल्या उपायोजना जाणून घेतल्या.सर्वांनी मास्क व सॅनिटायझर वापरा.घरी रहा सुरक्षित रहा.सर्वांनी आपली, आपल्या कुटुंबाची, गावाची,समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले. रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांच्या व ग्रामस्थांच्या समस्या समजावून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

       याप्रसंगी नगर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे,नायब तहसीलदार माधव गायकवाड,आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे,वैद्यकीय अधिकारी नितीन समुद्र,डॉ. सुरेश नेवसे, आरोग्य कर्मचारी सचिन तोडमल, पत्रकार सोहेल मनियार यांच्यासह नगर तालुका पंचायत समितीचे मा.सभापती प्रवीण कोकाटे,मा.उपसरपंच शरद भाऊ पवार,सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यापारी चंद्रकांत पवार,ग्राम विकास अधिकारी देवीदास मोरे,तलाठी घोळवे,माजी सरपंच दीपक चौधरी,अशोक कोकाटे,सचिन ठोंबरे,नानासाहेब कोकाटे,प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

     चिचोंडी पाटील गावांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विलगीकरण कक्ष बेड सह अद्यावत करण्याचे व ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल अशांनी घरी न थांबता,विलगीकरण कक्षात यावे, विलगीकरण कक्षात योग्य औषध उपचार व सुविधांसह रुग्णावर उपचार केले जातील याबाबत सूचना स्थानिक ग्रामसुरक्षा समितीस दिल्या.यावेळी ग्रामस्थ, कर्मचारी यांनी कोरोना रोगाच्या अनुषंगाने समस्या मांडल्या. ग्राम सुरक्षा समितीने कोरोना रुग्णांची देखभाल व काळजी घेण्याचे मान्य केले.

No comments:

Post a Comment