गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकणार दुचाकी, सराफ व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकणार दुचाकी, सराफ व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण

 गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकणार दुचाकी, सराफ व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः कोरोना च्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील निर्बंध कडक करण्यात आले आहेत.पुढील आठवड्यात मंगळवारी गुढीपाडवा असल्याने सलग दुसर्‍या वर्षी बाजारपेठेत ग्राहक आणि व्यावसायिकांचाही मुहूर्त चुकणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी वाहनासोबत सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. काही जण नवीन उद्योग व्यवसाय सुरू करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत कडक निर्बंध असल्याने सराफ व वाहन व्यवसायिकां सह अन्य व्यावसायिकांना ही मोठा फटका बसणार आहे.
शासनाने बाजारपेठेत लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद राहणार असल्याने या मुहूर्तावर बुक झालेल्या तसेच लग्नसराई करता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर्स कशा पूर्ण करायचे या विवंचनेत व्यवसायिक आहेत. शहरात या व्यवसायावर किमान शेकडो कामगार उदरनिर्वाह करतात.त्यामुळे आता त्यांना सराफ बाजारात काम करता येणार का? याचीही चिंता सतावत आहे.मागच्या वर्षीही कोरोनामुळे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्याने सराफी व्यवसायिक यांचे मोठे नुसकान झाले होते.
हीच परिस्थिती वाहन विक्रेत्यांची ही आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अहमदनगर जिल्ह्यात  मध्ये सुमारे एक हजाराच्या दरम्यान चारचाकी, तर शेकडो हून अधिक दुचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी या व्यवसायाला फटका बसणार आहे. खास गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी वाहने बुक करण्यात या ग्राहकांनाही वेळेत डिलिव्हरी देऊ शकणार की नाही हा प्रश्न व्यवसायिकांना भेडसावत आहे.

No comments:

Post a Comment