संजय कोठारींनी आंदोलनाचा इशारा देताच महावितरण कडून झाली सेवा सुरळीत ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 19, 2021

संजय कोठारींनी आंदोलनाचा इशारा देताच महावितरण कडून झाली सेवा सुरळीत !

 संजय कोठारींनी आंदोलनाचा इशारा देताच महावितरण कडून झाली सेवा सुरळीत !

मागण्या मान्य केल्याचे कोठारींना दिले लेखी आश्वासन




नगरी दवंडी

जामखेड  - सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वीजप्रश्री दिलेल्या आंदोलनाच्या इशा-याची गंभीर दखल घेत , जामखेड शहराचा वीजपुरवठा नियमीत व अखंडीत चालु ठेवण्याबरोबरच  वीजग्राहकांना आलेल्या जादा बील दुरूस्त करून देणे तसेच महावितरणशी सबंधीत कामे तातडीने करण्याचे लेखी आश्वासन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांनी दिले आहे.

        सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांना शहरातील वीज समस्याबाबत निवेदन दिले होते. यात  ग्राहकांची होणारी हेळसांड, तसेच वारंवार जाणारी वीज आणि त्यामुळे कोरोनाकाळात रूग्नांची होणारी गैरसोय, यातून  जीवितहानी होण्याचा धोका टाळण्यासाठी म्हणून  शहरात नियमीत अखंडीत वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

     दरम्यान सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांच्या निवेदनाची दखल घेत महावितरणमार्फत नियमीत व अखंडीत सेवा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपकार्यकारी अभियंता श्री कासलीवाल यांनी कोठारी यांच्या कार्यालयात येऊन  दिले आहे .

        जामखेड शहराचा वीजपुरवठा नियमीत व अखंडीत चालु ठेवणे, यासाठी उपाययोजना म्हणून  विद्युत वाहिनीवरील  झाडाच्या फांद्या तोडणे,  लूज गाळे ओढून ताईट करणे  ,वाकलेले खांब सरळ करून घेणे, रस्त्यावर आलेल्या तारा विद्युत वाहिन्या वर घेणे, शहरातून अथवा ग्रामीण भागातून ग्राहकांचा वीज गेल्यानंतर आलेले दुरध्वनी टाळाटाळ न करता , असे दुरध्वनी घेवून त्यांना ऊत्तर देणे याबाबतच्या  कर्मचाऱ्यांना सूचना देणे ,अव्वाच्यासव्वा लाईट बिल देऊन निम्म्या पैशात सेटलमेंट करणे अशा गोष्टी घडू नयेत , वेळेवर  मिटर रिडींग घेणेबाबत संबंधित एजन्सीला सूचना देणे अशा अनेक तक्रारींचे निवारण करण्याचे लेखी आश्वासन  उपकार्यकारी अभियंता  कासलीवाल यांनी दिले आहे.

       यावेळी  सहाय्यक अभियंता हिरामण गाविद ,अमित गंभीर, सुनील जगताप, नीलेश ढेपे ,गणेश ढेपे आदी सह उपस्थित होते.


लेखी आश्वासन दिल्याने जामखेड शहराचा वीजपुरवठा नियमीत ठेवण्याबरोबरच अन्य मागण्या येत्या १५ दिवसात सोडवल्या जातील अशी आशा आहे.अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही.'

- संजय कोठारी सामाजिक कार्यकर्ते

No comments:

Post a Comment