पार्किंगची सोय नसलेल्या व अनाधिकृत बांधकाम केलेल्या त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 6, 2021

पार्किंगची सोय नसलेल्या व अनाधिकृत बांधकाम केलेल्या त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी

पार्किंगची सोय नसलेल्या व अनाधिकृत बांधकाम केलेल्या त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी

आरपीआयच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

अहमदनगर ः शहरातील पद्मावती हॉस्पिटलचे अनाधिकृत बांधकाम व पार्किंगची तपासणी करुन सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघमारे, तुषार धावडे, सागर पवार आदी उपस्थित होते.
शहरातील स्वस्तिक चौक, गणेशवाडी येथे पद्मावती हॉस्पिटल असून, यामध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हॉस्पिटल शेजारी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि सोसायटी असून, पद्मावती हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक रस्त्यावर वाहने लावत असल्याने येथील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांसाठी व  स्टाफसाठी पार्किंगची कुठलीही व्यवस्था केलेली नसल्याने सदर ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. हॉस्पिटलच्या तिसर्या मजल्यावर समाजकल्याण अंतर्गत मुलींचे वसतीगृह देखील असून, त्यांची पार्किंग देखील रस्त्यावर केली जाते. हॉस्पिटलच्या इमारतीत कुठल्याही प्रकारची पार्किंगची सोय करण्यात आलेली नाही. वाहतुक कोंडी झाल्यास हॉस्पिटलचे कर्मचारी स्थानिक नागरिकांनाच अरेरावीची भाषा करतात. तर संबंधित हॉस्पिटलचे बरेचसे बांधकाम अनधिकृत आहे. या प्रश्नाबाबत मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन तक्रार करण्यात आली आहे. मात्र मनपा प्रशासन संबंधित हॉस्पिटलला पाठीशी घालत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. सदर हॉस्पिटलच्या बांधकामांची महापालिकेच्यावतीने मोजणी करून पार्किंग आणि आणि अधिकृत बांधकाम तपासणी करावी, या प्रकरणी दोषी असलेल्या हॉस्पिटल प्रशासनाला दंड आकारुन कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here