व्यवसायामध्ये दर्जा, प्रामाणिकपणा व आपुलकीने प्रगती : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

व्यवसायामध्ये दर्जा, प्रामाणिकपणा व आपुलकीने प्रगती : आ. संग्राम जगताप

 व्यवसायामध्ये दर्जा, प्रामाणिकपणा व आपुलकीने प्रगती : आ. संग्राम जगताप

सावेडी नाका येथे व्ही. दासी फॅमिली पान सेंटरचा शुभारंभ


अहमदनगर ः
दासी पान सेंटरचे संस्थापक पुंडलिक दासी यांनी 1972 च्या दुष्काळामध्ये पान व्यवसायाच्या क्षेत्रात पुढाकार घेऊन माळीवाडा बसस्थानक परिसरामध्ये पानाचे दुकान सुरु केले. सुमारे 50 वर्षांची परंपरा असणारी दासी पान सेंटरने आपल्या व्यवसायामध्ये नागरिकांचा विश्वास संपादन केला. याचबरोबर नगर शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली. व्यवसायमध्ये दर्जा, प्रामाणिकपणा व ग्राहकांची आपुलकी मिळविल्यास व्यवसायात प्रगती होते. दीपक दासी यांनी आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय पुढे चालू ठेवीत ग्राहकांना बदलत्या काळानुसार सेवा देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन आ. संग्रामजगताप यांनी केले.
सावेडी नाका येथे व्ही. दासी फॅमिली पान सेंटरचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, संचालक दीपक दासी, विकीजगताप, राम पिंपळे, मनोज चिपोळे, रमेश नंदाल, प्रकाश दासी, मयूर दासी, सिद्धांत दासी, संकेत दासी, ओम दासी, मिलिंद कोलते, सुदांशु दासी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दीपक दासी म्हणाले की, वडिलांच्या पान विक्रीचा व्यवसायात गुणत्तेची तडजोड न करता उत्तम प्रतिचे पानसेवा देण्यात यशस्वी ठरलो आहोत. 2012 साली मलई, म्गई व चॉकलेट पानाचा शोध लावण्यात यश मिळविले. या पानाच्या शोधामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व्ही. दासी पान अवघ्या काही कालावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर गुलकंद गोळ्यांचा शोध देखील लावण्यात आला.

No comments:

Post a Comment