आंबेडकरांची शिकवण कार्यकर्ते कृतीतून आचरणात आणत आहेत - महापौर. वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

आंबेडकरांची शिकवण कार्यकर्ते कृतीतून आचरणात आणत आहेत - महापौर. वाकळे

 आंबेडकरांची शिकवण कार्यकर्ते कृतीतून आचरणात आणत आहेत - महापौर. वाकळे

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने अन्नदानाचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्या कोरोनामुळे सर्वच घटकांना मोठा फटका बसला आहे. त्यात हातावर पोट असणार्यांचे हाल होत आहेत. शासकीय पातळीवर यावर उपाय योजले जात आहेत, परंतु ते तोडके पडत आहे. अशावेळी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन गरजवंतांना मदतीचा हात देऊन दिलासा देण्याचे काम करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपले आयुष्य अशा वंचित घटकांच्या उद्धारासाठी वेचले आहे. त्यांचा उद्धर व्हावा, त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणुन त्यांना त्यांचे हक्क मिळवावे, यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला. त्यांनी दिलेली हीच शिकवण कृतीतून आचरणात आणून भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते कार्य करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. या कार्यात आपणही सर्वपातळ्यांवर सहकार्य करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मागील पाच दिवसांपासून अन्नदानाचा उपक्रम सुरु करण्यात आला. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सभागृह नेते रविंद्र बारस्कर, सचिन पारखी, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस उमेश साठे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उमेश साठे म्हणाले, दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या महामारीमुळे साध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करुन अन्नदाना उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या 5 दिवसापासून विविध भागातील गरजूंना मोफत अन्न पाकिटांचे वितरण कार्यकर्त्यांमार्फत सुरु आहे. यापुढेही दानशूरांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु राहील. अशा उपक्रमातून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित कार्य करत आहोत. याप्रसंगी भैय्या गंधे, वसंत लोढा आदिंनी मनोगतातून उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी विनायक वैराळ, दिपक उमाप, अक्षय पुंडे, सनी साठे, अक्षय उमाप, सुजल नेटके आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment