भाळवणीचे आरोग्य मंदीर बनले जिल्हयाचे आधार केंद्र ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 22, 2021

भाळवणीचे आरोग्य मंदीर बनले जिल्हयाचे आधार केंद्र !

 भाळवणीचे आरोग्य मंदीर बनले जिल्हयाचे आधार केंद्र ! 

दुष्काळी मतदार संघाचे असेही दायित्व : सुमारे ५०० रुग्ण मतदारसंघाबाहेरील !पारनेर :  प्रतिनिधी -    

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जिल्हयातील हजारो रूग्ण ग्रासलेले असताना आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवणी येथे सुरू करण्यात आलेले शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर मतदारसंघाचे नव्हे तर संपूर्ण जिल्हयातील  रूग्णांसाठी आधार केंद्र बनले आहे. ! अवघ्या चार दिवसांत तेथे क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण दाखल झाले असून अतिरिक्त रूग्णांसाठीही आ. लंके यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

मागील वर्षी कारोनाची लाट आल्यानंतर आमदार लंके यांनी लॉकडाउनमुळे घरी परतणाऱ्या परप्रांतीय नागरीकांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. सुमारे साडेचार लाख नागरीकांना त्याचा लाभ झाला. रणरणत्या उन्हात अनवाणी जाणाऱ्या शेकडो मजुरांच्या पायामध्ये आ. लंके यांनी स्वतः चप्पल घातली. परराज्यात, परजिल्हयातील वाहतूक सुरू झाल्यानंतर हजारो नागरीकांना त्यांच्या घरी पोहचविण्याची जबाबदारी लंके यांनी आपल्या खांदयावर घेतली. 

लॉकडाउन शिथिल करण्यात आले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कर्जुले हर्या येथे एक हजार बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करून आ. लंके यांनी सामान्य रूग्णांना दिलासा दिला. साडेचार हजार रूग्णांना तेथे मोफत उपचार, सुविधा देण्यात आल्या. त्यात सामान्य रूग्णांच्या कोटयावधी रूपयांची बचत झाली. त्या सेंटरमध्येही पारनेर - नगर मतदार संघाव्यतिरिक्त नगर जिल्हयासह पुणे जिल्हयातील रूग्णांनी लाभ घेतला. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरीक बाधित झाले. मतदारसंघातील नागरीक भयभित झालेले असताना आ. लंके यांनी भाळवणी येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांत हे सेंटर सुरू झाल्यानंतर मतदारसंघाबरोबरच नगर शहर, राहूरी, श्रीगाेंंदा, संगमनेर, नेवासे, पाथर्डी तसेच पुणे जिल्हयातील जुन्नर, शिरूर येथील सुमारे ५००  रूग्ण भाळवणी येथे उपचार घेत आहेत. 

जिरायती तसेच दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या या मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीने सामान्य रूग्णांसाठी सुरू केलेल्या या आरोग्य मंदीराची चर्चा राज्यभर सुरू असून रूग्णांचा ओघ असाच सुरू राहिला तर आणखी एखादे आरोग्य मंदीर उभे करण्याची मोठी जबाबदारी आ. लंके यांच्यावर पडणार आहे. अर्थात सर्वसामान्य जनतेच्या हिताचा वसा घेतलेल्या या लोकनेत्याकडून ती जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली जाईल यात शंका नाही. 

 

माणूस नाही, देव आहे हा देव ! 

 कोरोनाची बाधा झाली, नगरमधील  खुप रूग्णालयात फिरले, एक लाख, दोन लाखांची मागणी केली गेली. आमच्याकडे तर पैसे नव्हते.  तिन दिवसांपूर्वी मी भाळवणी येथे दाखल झाले. येथे तपासण्या, चाचण्या करण्यात आल्या. औषधे देण्यात आली. पैसे देउनही नगरमध्ये हे होत नाही. आमदार नीलेश लंके यांच्यामुळे माझा जिव वाचू शकला.  हा माणूस नाही, माझ्यासाठी देव आहे देव ! माझे पुढील आयुष्य त्यांना लाभावे ! 

सिंधू बाळासाहेब पवार 

बालाजी नगर, अहमदनगर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here