दहावी-बारावी पाठोपाठ वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या; - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

दहावी-बारावी पाठोपाठ वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या;

 दहावी-बारावी पाठोपाठ वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या;

वैद्यकीय शिक्षणमंत्र्याची घोषणा

मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत  येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीयशिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.या परीक्षा पुढे ढकलणे बाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार दहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या होत्या. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला.

No comments:

Post a Comment