महिलेच्या पर्समधील मोबाईल, दागिने चोरणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

महिलेच्या पर्समधील मोबाईल, दागिने चोरणारा गजाआड.

 महिलेच्या पर्समधील मोबाईल, दागिने चोरणारा गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कापड बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेल्या वैशाली उमेश देठेकर रा. हनुमान नगर केडगाव यांच्या बॅगमधील चांदीचे दागिने, मोबाईल चोरणार्‍या हरी कल्याण भोसले. रा. भानसहिवरा यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
   सदर घटनेची हकीकत अशी की, 9 फेब्रुवारी 2021 रोजी वैशाली उमेश देठेकर यांनी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे बॅगची चैन उघडून बॅगमधील चांदीचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 7000/- रू किमतीचा ऐवज चोरून नेला अशी फिर्याद कोतवाली पोलिस स्टेशनला दिली होती.
   गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांचे मदतीने गुन्ह्याचा तपास करीत असताना माहिती मिळाली की, हा गुन्हा हरी कल्याण भोसले रा. भानसहिवरा ता. नेवासा याने केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील दत्तात्रय हिगंडे, सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सागर सुलाने, ऊमाकांत गावडे यांनी भानसहिवरा ता. नेवासा येथे जाऊन आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनीय माहिती घेऊन बस स्टँड परिसरात सापळा लावून आरोपी हरी कल्याण भोसले वय 42 वर्ष रा. भानसहिवरा ता. नेवासा जि. अहमदनगर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देवू लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता. त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल करून गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमालापैकी सॅमसंग कंपनीचा मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेवून कोतवाली पोस्टे. येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही कोतवाली पोस्टे करत आहेत. ही कारवाई मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, विशाल ढुमे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment