अनामप्रेम कोव्हिड सेंटर सामान्य रुग्णांना दिलासा देईल : प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

अनामप्रेम कोव्हिड सेंटर सामान्य रुग्णांना दिलासा देईल : प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन

 अनामप्रेम कोव्हिड सेंटर सामान्य रुग्णांना दिलासा देईल : प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. कोरोना झाल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात बेड्स मिळण्यात अडचणी येत आहेत. याचवेळी स्नेहालय परिवाराच्या अनामप्रेम कोव्हिड केअर सेंटरची सुरुवात म्हणजे गोर-गरीब रुग्णांना दिलासा आहे. निंबळक (ता. नगर) येथील गौरांग सरफरे अंध शाळेतील कोव्हिड केअर सेंटर हे 22 गावातील रुग्णांना उपचार पुरवणारे केंद्र ठरेल असे प्रतिपादन प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले.
   अनामप्रेम कोव्हिड केअर सेंटर ची सुरुवात मंगळवारी करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती मांडगे,  डॉ.शंकर केदार, डॉ.के.एन.पोहरे, अ‍ॅड. श्याम असावा, स्नेहालयचे राजीव गुजर,  अनामप्रेमचे अजित कुलकर्णी, आमी संघटनेचे संजय बंदिष्टी, अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने, सचिव दीपक बुरम तसेच हनिफ शेख, प्रशांत भोंग, दीपक पापडेजा उपस्थित होते.आगामी काळात गरज लागण्यास अधिक 40 बेड्स या सेंटर ला वाढवण्यात येणार असल्याचे स्नेहालय परिवाराचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी आणि भरत कुलकर्णी यांनी सांगितले आहे. या कोव्हिड सेंटर च्या उभारणीसाठी विष्णू वारकरी, उमेश पंडुरे, विशाल अहिरे, सुलक्षणा आहेर, सुनील कांबळे, प्रदीप पठाडे, विक्रम प्रभू, नितीन गोटे,  नीलम माळी यांनी मेहनत घेतली आहे.

No comments:

Post a Comment