गांधीनगरमध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी स्वखर्चातून टाकली पिण्याची पाईपलाईन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

गांधीनगरमध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी स्वखर्चातून टाकली पिण्याची पाईपलाईन

 गांधीनगरमध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी स्वखर्चातून टाकली पिण्याची पाईपलाईन

  प्रभाग 8 मधील नगरसेवक हे गांधीनगर भागात निवडूण आल्यापासून कधीच फिरकले नाही. व नागरिकांच्या समस्या कधीही समजून घेतल्या नाहित. मग हे नगरसेवक कोणाच्या कामाचे आहेत असा प्रश्न महिलांनी विचारला आहे.  

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः प्रभाग 8 मधील गांधीनगर या भागातील फारूख पठाण घर ते नवनाथ जगधने घरांपर्यंत  पिण्याची पाईपलाईन निष्कृष्ट दर्जाची झाल्याने यातुन दुषित पाणीपुरवठा होत होता. ही पाईपलाईन नवीन टाकण्यासाठी महिलांनी प्रभाग 7 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्याकडे मागणी केली असता संबंधित पाईपलाईनची पाहणी करून वाकळे यांनी पुर्वीची निकृष्ट झालेली पाईपलाईन काढुन नवीन स्वखर्चातुन टाकली.
परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. व याच पाईपलाईनने दुषित पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे  या भागातील नागरिकांनी वाकळे यांच्याकडे मागणी केल्यानंतर वाकळे यांनी स्वखर्चाने जेसीबी व एक स्विस वॉल दिला. तर नागरिकांनी लोकवर्गनीतुन पीव्हिसी पाईप टाकले. या कामामुळे परिसरातील महिलांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तसेच या कामाचे सविता महाडूंळे, माया क्षेत्रे, मनिषा जगधने, इंद्रायणी रोहोकले, सविता चिंचकर, आदिका उल्हारे यांनी नगरसेवक वाकळे यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here