ठेका रद्द करण्याची माणुसकी फाउंडेशन ची मागणी.
केडगाव अमरधाममध्ये अंत्यविधी साहित्याची जादा दराने विक्री.केडगाव अमरधाममधील अंत्यविधी साहित्य विक्रीस परवानगी देण्यात आली त्याबाबत गारुडकर यांचेशी चर्चा करण्यात येईल असे आश्वासन उपायुक्त डांगे यांनी दिले आहे. माझ्याकडे अनेक नागरिकांनी या अंत्यविधी साहित्याची या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी दिल्या नंतर मी याबाबत शहानिशा केली व उपायुक्तांना या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगितले आहे.
- अमोल येवले, नगरसेवक.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अंत्यविधीसाठी लागणारे सरपण, गवर्या इ. साहित्य केडगाव अमरधाममध्ये जादा रकमेने विकली जात असून केडगाव मधील अंत्यविधी साहित्याचा ठेका रद्द करण्याची मागणी माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक विठ्ठल महाराज हरिदास कोतकर यांनी मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विठ्ठल महाराज यांनी म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येणार्या नालेगाव व केडगाव अमरधाम येथे महापालिकेच्यावतीने ठेकेदारामार्फत अंत्यविधी साठी लागणारे सरपण, गवर्या व इतर साहित्याची विक्री केली जाते. या दोन्ही ठिकाणच्या अंत्यविधीच्या साहित्याच्या दरात फार मोठा तफावत आहे उदाहरणच घ्यायचं असेल तर केडगाव अहमदनगर येथे सरपण रू.300/- प्रति मन या दराने विक्री केली जाते तसेच शेनाची गवरी रू.500/- शेकडा या दराने विक्री केली जाते तर नालेगाव अमरधाम याठिकाणी सरपण रू.200/- प्रति मन व गवरी रू.90/- या दराने विक्री केली जाते आपणच नेमलेल्या ठेकेदारांच्या दरांमध्ये तफावत का आहे? याचा शोध घेऊन केडगाव अमरधाम येथील ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्या ठिकाणी नगर अमरधाम मधील ठेकेदाराच्या दरात सदर साहित्याची विक्री करणार्या ठेकेदारांची नेमणूक करावी. जेणेकरून केडगाव नागरिकांचे मरण तरी सुसह्य होईल. तसे न झाल्यास नागरिकांना बड्या दाराने साहित्य घेऊन नाहक मानसिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागेल.
केडगाव अमरधाम येथील सदर अंत्यविधी साहित्याची विक्री करणार्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्या ठिकाणी नगर अमरधाम मधील ठेकेदारांच्या दरात सदर साहित्याची विक्री करणार्या ठेकेदारांची नेमणूक करण्याबाबत योग्य ते आदेश व्हावेत असेही निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment