जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध - राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध - राठोड

 अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता आठवड्यातील सर्व दिवस राहणार सुरु

जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध - राठोड

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा आणि रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला केल्या आहेत. कोविड रुग्णालयांशी संलग्न मेडीकल स्टोअर्समध्ये रेमडेसीवीर च्या विक्रीकरीता उपलब्ध करुन देण्यात आले असुन सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविड रुग्णालयांना मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहील आणि मागणीप्रमाणे रुग्णालयांना त्याचा पुरवठा होईल, याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अशोक राठोड यांनी दिली आहे.
   औषधाची आणि मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन तसेच उत्पादक, वितरक आणि रुग्णालयाचे प्रतिनिधी यांच्याबाबतचा समन्वय केला जात आहे. त्यासाठी आठवड्याचे सर्व दिवस हे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले. जिल्ह्यात आज रोजी रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णापैकी साधारणता 2 हजार 419 रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज आहे सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 210 रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील पाच उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांकरिता आज रोजी 24 मेट्रीक टन मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ऑक्सीजनचे वितरण केल्यानंतर देखील 23 मेट्रीक टनचा साठा जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे, असे श्री. राठोड यांनी स्पष्ट केले आहे. औषधाची आणि मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने कोणत्याही अडचणी असल्यास 7045757882 आणि 8975624123 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राठोड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment