नगरसेवकांच्या विकासकामांना नागरिकांच्या सहकार्याचे पाठबळ मिळाले ः वारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

नगरसेवकांच्या विकासकामांना नागरिकांच्या सहकार्याचे पाठबळ मिळाले ः वारे

 नगरसेवकांच्या विकासकामांना नागरिकांच्या सहकार्याचे पाठबळ मिळाले ः वारे

हॉटेल देवभोग ते पाटील घर रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
प्रभाग छोटा असेा या मोठा कामे करण्याची मनापासून तळमळ हवी. प्रभाग क्र.2 हा खूप मोठा असूनही आम्ही चारही नगरसेवक रोज प्रभागात सर्वांच्या संपर्कात असतो, त्यामुळे छोटे-छोटे प्रश्न लक्षात येतात. नगरसेवकांच्या विकास कामांना नागरीकांच्या सहकार्याने पाठबळ मिळाले, त्यामुळेच विकासाला गती मिळाली, असेच सहकार्य करुन प्रभागाचा विकास साधावा, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी  केले.
प्रभाग 2 मधील हॉटेल देवभोग ते पाटील घर पर्यंत रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ श्री.वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, शिवाजी ठोंबरे, विजय पोकळे, सत्यजित पाटील, बाळासाहेब तिमोणे, संजय कोठारी, अरुण लोळगे आदि उपस्थित होते.
    श्री.वारे पुढे म्हणाले, नगर शहरातील 17 प्रभागामध्ये ड्रेनेज, रस्ते, पाण्याची लाईन कामांना प्राधान्य दिले आहे, पण काही प्रभागात ड्रेनेज कामे, रस्ते कामे सुरु असतांना नागरिकांनी दारासमोर केलेले रॅम्प, गेट काढण्यास विरोध करतात, त्यामुळे तेथे काम करण्यात अडथळ येतो. परिणामी काही कामे होत नाही, आपल्या प्रभागातील नागरिक मात्र विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी स्वत:हून पुढे येतात. सहकार्याची भुमिका घेतात, त्यामुळे कामे तातडीने मार्गी लागत असून, या नागरिकांच्या सहकार्यावर विकास कामे अवलंबून असतात, असे ते म्हणाले.
    यावेळी नागरिकांनी चारही नगरसेवकांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. तत्परतेने कामे पूर्ण कशी होतील, याकडे हे लक्ष देतात. या भागातील विकास कामांना आ.संग्राम जगताप हे देखील जास्तीत जास्त निधी देत असल्याने नगरसेवकांना सहकार्य करुन कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही आग्रही असतो, असे सांगितले. नगरसेवक सुनित त्र्यंबके, विजय पोकळे, संजय गवळी, सोहम वाघ, समीर गवळी आदिंनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी स्वाती पाटील, वर्षा पोकळे, द्वारका ठोंबरे कॉलनीमधील रहिवासी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment