नगरसेवक मनोज कोतकरांचे आयुक्तांना निवेदन केडगाव उपनगरात कोवीड सेंटर सुरू करा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

नगरसेवक मनोज कोतकरांचे आयुक्तांना निवेदन केडगाव उपनगरात कोवीड सेंटर सुरू करा!

 नगरसेवक मनोज कोतकरांचे आयुक्तांना निवेदन केडगाव उपनगरात कोवीड सेंटर सुरू करा!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  केडगाव हे शहराचे एक मोठे उपनगर असून येथे दाट लोकवस्ती आहे. कोरोना संसर्ग विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रत्येक घरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या पाहता केडगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे. मनपाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना सुरू करुन केडगाव उपनगरामध्ये 100 बेड व ऑक्सिजनच्या मुबलक पुरवठ्यासह कोविड सेंटर येत्या 4 दिवसात सुरु करावे, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कोतकर यांनी म्हटले आहे की, नगर शहरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत
असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासकीय रुग्णालय, मनपा रुग्णालयांबरोबरच खासगी हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच आरोग्या सुविधा मिळत नसल्यामुळे उपचारासाठी रुग्ण व नातेवाईकांची धावपळ होत आहे. यासाठी महापालिकेने रुग्णांना चांगली आरोग्य देण्याचे कर्तव्य आहे. या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये ताबडतोब कोविड कक्ष सुरू करून रुग्णांना व नातेवाईकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर करुन सर्व आरोग्य सुविधांची माहिती देण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment