स्थलांतरित कामगारांमध्ये विविध उपक्रमाद्वारे एडस् व गुप्तरोगाबद्दल जनजागृती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 1, 2021

स्थलांतरित कामगारांमध्ये विविध उपक्रमाद्वारे एडस् व गुप्तरोगाबद्दल जनजागृती

 स्थलांतरित कामगारांमध्ये विविध उपक्रमाद्वारे एडस् व गुप्तरोगाबद्दल जनजागृती

अमृतदिप प्रकल्पाचा स्थलांतरीत कामगारांसाठीचा उपक्रम
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील नगर, सुपा, पांढरीपुल येथील औद्योगिक परिसर, शहरातील हॉटेल, बांधकाम यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार कार्यरत आहेत. कंपनी, हॉटेल, वीटभट्टी, खडी क्रेशर, बांधकामगार, फेरीवाले, ऊस तोड कामगार या स्थलांतरीत कामगारांमध्ये एचआयव्ही एडस् व गुप्तरोगाबद्दल जनजागृती करुन त्यांची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्था मुंबई यांच्या सहकार्याने श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अमृतदिप प्रकल्पच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
   जिल्हा रुग्णालय, जिल्हा एडस् नियंत्रण कक्ष अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाने अमृतदिप प्रकल्पाने दि. 15 ते 25 मार्च या कालावधीत 540 स्थलांतरित कामगारांमध्ये गुप्तरोग, एचआयव्ही एडस्ची पथनाट्यातून जनजागृती केली. आरोग्य तपासणी शिबीरातून 333 कामगारांची गुप्तरोग तर 278 कामगारांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. 465 कामगारांची इतर आजारांची तपासणी करुन त्यांना हे आजार टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती अमृतदिप प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली. उपस्थित सर्व कामगारांचे समुपदेशन करण्यात करण्यात आले. समुपदेशन सत्रादरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही बांधित रुग्णास इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई दुसर्यांना वापरल्याने, एचआयव्हीबाधित व्यक्तीचे रक्त दुसर्या रुग्णाला दिल्याने, एचआयव्हीग्रस्त गरोदर महिलेपासून तिच्या होणार्या बाळाला (नाळेमार्फत), स्तनपानद्वारे आदी कारणांमुळे एचआयव्हीचा प्रसार होऊ शकतो. एचआयव्हीचा विषाणू सहजरित्या शरीराबाहेर हवेत जास्तकाळ जगू शकत नाही. एचआयव्ही बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसल्याने, जेवल्याने, राहिल्याने, डास चावल्याने याचा प्रसार होत नसल्याची माहिती प्रकल्पाच्या समुपदेशक पल्लवी हिवाळे-तुपे यांनी उपस्थित कामगारांना दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here