पंडित दीनदयाळ पतसंस्थेची अत्याधुनिक मोबाईल अ‍ॅप बँकिंग सेवा सुरु - वसंत लोढा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

पंडित दीनदयाळ पतसंस्थेची अत्याधुनिक मोबाईल अ‍ॅप बँकिंग सेवा सुरु - वसंत लोढा

 29 वी वार्षिक सभा ऑनलाईन संपन्न

पंडित दीनदयाळ पतसंस्थेची अत्याधुनिक मोबाईल अ‍ॅप बँकिंग सेवा सुरु - वसंत लोढा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व सभासदांना आधुनिक व चांगली तत्पर सेवा मिळावी यासाठी पतसंस्थेच्या कारभारात काळानुरुप बदल करत आधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा देताना आता डीजीटल बँकिंग क्षेत्रात प्रवेश करत आहोत. दीनदयाळ पतसंस्थेने आता स्वतःचे मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे. त्यामुळे या अत्याधुनिक बँकिंग सुविधांमुळे ग्राहकांना पतसंस्थेशी ऑनलाइन व्यवहार करता येणार असल्याने ग्राहकांचा मौलिक वेळ व पैसा वाचणार आहे. त्यामुळे सर्व  ग्राहकांनी आपल्या मोबाईल मध्ये दीनदयाळ पतसंस्थेचे अ‍ॅप डाऊनलोड करून या आधुनिक सेवांचा जास्ती जास्त लाभ घ्यावा. गेल्या वर्षापासून आलेल्या करोना संकट काळातही दीनदयाळ पतसंस्थेने आपला प्रगतीचा आलेख उंचावला आहे. अनेक महिला बचत गटांना पतसंस्थेने कर्ज देवून महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे, अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
   पंडित दीनदयाळ पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन वसंत लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने उत्साहात संपन्न झाली. यावेळी मानद सचिव विकास पाथरकर, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, जेष्ठ संचालक सुधीर पगारीया, शैला चंगेडे, डॉ. ललिता देशपांडे, नकुल चंदे, किरण बनकर, नरेंद्र श्रोत्री आदींसह सभासद ऑनलाईन सहभागी झाले होते. मानद सचिव विकास पाथरकर म्हणाले, शहरात अनेक बँका व पतसंस्था आहेत. मात्र स्पर्धेच्या व मंदीच्या काळातही दीनदयाळ पतसंस्थेचा उत्कृष्ट व विना तक्रार कारभार होत आहे. यात सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचा मोलाचे योगदान आहे. करोनाच्या संकटा मुळे  कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी संयमाने पण रीतसर कर्ज वसुली करत एनपीए कमी करण्यात यश आले आहे. केवळ नफा कमविणे हा उद्देश नसून झालेल्य नफ्यातून काही भाग हा सामाजिक कार्यासाठी खर्च करत आहे. महिला बचत गट योजने बद्दल माहिती देतांना सुधीर पगारिया म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सुचविलेली अंत्योदय योजना आम्ही महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी कुटूंब उभे केले आहे. या महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी दीनदयाळ पतसंस्था महिला बचत गट कर्ज योजना राबवत आहे.
   सभेचे सूत्रसंचालन किरण बनकर यांनी केले, व्यवस्थापक निलेश लाटे यांनी अहवाल वाचन केले. उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रा.मधुसूदन मुळे, मंगेश निसळ, प्रा.सुनील पंडित, भैय्या गंधे, सचिन पारखी, मुकुंद वाळके, हेमंत मिरीकर आदींनी चर्चेत भाग घेत सूचना केल्या.

No comments:

Post a Comment