कोरोना रुग्णाची वाढीव बिले... मनसेच्या निवेदनाची.. जिल्हाधिकार्‍यांकडून दखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

कोरोना रुग्णाची वाढीव बिले... मनसेच्या निवेदनाची.. जिल्हाधिकार्‍यांकडून दखल.

 कोरोना रुग्णाची वाढीव बिले... मनसेच्या निवेदनाची.. जिल्हाधिकार्‍यांकडून दखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः साहेब खाजगी हॉस्पिटलला पाठीशी घालू नका, शब्द पाळा! या मनसेच्या निवेदनाची जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दखल घेतली असल्याचे मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी सांगितले.
   जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांच्या समिती व्दारे बिलाची चौकशी करणार व ताबडतोप समिती स्थापन करणार तसेच खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक बोलावली जाईल रुग्णाला अ‍ॅडमिट करतांना डीपॉझिट रक्कम घेतली जाणार नाही असे आदेश देणार तसेच शासन नियमाप्रमाणे बिले बेड चे दर आकारले नाहीतर खाजगी हॉस्पिटल वर कारवाई करणार असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. असल्याचे भुतारे म्हणाले. त्यामुळे मनसेच्या निवेदनाची तातडीने दखल घेतल्यामुळे खाजगी हॉस्पिटल जिल्हाधिकारी यांच्या रडारवर आले आहेत. मनसेच्या मागणी मुळे खाजगी हॉस्पिटल मध्ये कोरोना आजारांवर उपचार घेणार्‍या रूग्णांची सर्वसामान्य नागरिकांची लूटमार होणार नाही. त्यामुळे जनतेत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment