पंचायत समितीच्या दुसर्‍या मजल्यासाठी दोन कोटीचा निधी देणार ः शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

पंचायत समितीच्या दुसर्‍या मजल्यासाठी दोन कोटीचा निधी देणार ः शेळके

 पंचायत समितीच्या दुसर्‍या मजल्यासाठी दोन कोटीचा निधी देणार ः शेळके


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पंचायत समिती मध्ये जागा अपुरी असल्यामुळे येथील विभाग दोन तीन ठिकाणी विखुरलेले आहेत. हे सर्व विभाग पंचायत समितीच्या आवारात आणणार. जिल्हा परीषदेच्या घसार्‍यामधून दोन कोटी रुपायाचा निधी पंचायत समितीत दुसरा मजला करण्यासाठी देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी केले .
पंचायत समितीच्या नूतन सभापती सुरेखा गुंड उपसभापती डॉ. दिलीप  पवार यांनी बुधवारी (दि.31) पदभार घेतला, यावेळी ते  बोलत होते . यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, जि.प. सदस्य संदेश कार्ले, जि. प. सदस्य शरद झोडगे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, रामदास भोर, नगरसेवक योगीराज गाडे, गटविकास अधिकारी सचिन धाडगे, माजी  सभापती प्रविण कोकाटे, रविंद्र भापकर, व्ही.डी. काळे, गुलाब शिंदे, प्रकाश कुलट, निसार पठाण, चंद्रकांत खाडे, संदिप गुंड यावेळी उपस्थित होते .
   शेळके म्हणाले सध्या कोरोना चा काळ चालू आहे .कोरोना  धरून चालायचा आपल्या विकास कामात कुठेही अडचण येणार नाही . महाआघाडीचे सरकार आहे निधीची कमतरता पडणार नाही. सुरेखा गुंड म्हणाल्या, पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सामन्य नागरिंकाचे प्रश्न सोडवले जातील. पवार म्हणाले, कोरोना जरी असला तरी तुमच्या अडचणी सोडवल्या जातील.  दुरध्वनी मार्फत नागरिकानी आपल्या अडचणी सांगीतल्या तरी चालेल.

No comments:

Post a Comment