साईदीप हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

साईदीप हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा...

 साईदीप हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा...

बिलासाठी कोरोना मृतदेह, 12 तास अडकवून ठेवला हे वृत्त निराधार !
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः साईदीप हॉस्पिटलमध्ये करोना मयताचा मृतदेह पैशासाठी बारा तास अडकवून ठेवला ही तक्रार पूर्णतः निराधार व तथ्यहीन असून शासन नियमाप्रमाणे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत.  हॉस्पिटलकडून करोना उपचारासाठी शासन नियमाप्रमाणेच बिल आकारणी केली जाते. दरपत्रकही पारदर्शक पद्धतीने दर्शनी भागात लावण्यात आले आहे. त्यामुळे हॉस्पिटलकडून बिलासाठी मृतदेह अडकवून ठेवला, नातेवाईकांना अरेरावी केली या तक्रारीत कुठलेही तथ्य नाही असा स्पष्ट खुलासा साईदीप हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. याबाबत हॉस्पिटलने जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनाही खुलासा प्रत पाठवली आहे.
    कोविड रूग्ण  मृत पावल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देता येत नाही हा शासकीय नियम आहे.कल्पना चंद्रकांत गायकवाड़ या महिला रूग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह हॉस्पिटलने बिलासाठी अडकवून ठेवला आणि योग्य उपचार झाले नाही म्हणून हॉस्पिटल विरुद्ध कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकड़े करणारे सामाजिक कार्यकर्त्यांनी उपचारादरम्यान कधीही रूग्णाच्या प्रकृती संबंधी  हॉस्पिटलमध्ये समक्ष भेटून  माहिती घेतली नाही.  तक्रार व वस्तुस्थिती खूप वेगळी आहे.  
     या रूग्ण महिलेला दिनांक 15 मार्च रोजी अत्यवस्थ परिस्थिति मध्ये ज्या मध्ये त्यांचे फुफुस जवळपास 80 ते 90 %  निकमी अवस्थेत होते. कोविड उपचारासाठी दाखल करण्यात आले एडमिट करताना तसेच दैनंदिन त्यांचे चिरंजीव कुणाल, नीलेश व पति चंद्रकांत याना या बाबत पूर्ण माहिती दिली होती व पेशंट च्या जगण्याचे संकेत खुप कमी आहेत असे सांगण्यात आले.13 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यात  त्यांचा शनिवार दिनाक 27 मार्च रोजी रात्रि 11.55 वाजता मृत्यु झाला  त्यावेळी अंत्यसंस्कार प्रक्रिया बंद असते. म्हणून सदर  मृतदेह शवगरात ठेवण्यात आला.  रविवारी सकाळी नातेवाईकांनी मृतदेह आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु कोविड असल्याने मनपाच्या नियमाप्रमाणे मनपाला कळविन्यात येऊन मृतदेह अमरधामला पाठवण्यात आला.  हॉस्पिटल बिलाची  रक्कम एडवांस स्वरुपात नातेवाईकानी वेळोवेळी भरलेली  आहे व  या रूग्णाचे मेडिकलचे 31 हजार रुपये बिल आज ही बाकी आहे. पैशांसाठी मृतदेह दिला नाही हा आरोप पुर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे.
    या रूग्णावर उपचार सुरू असताना रोज  नातेवाईकांना सर्व माहिती दिली जात होती.  बिलाची माहिती सुद्धा वेळोवेळी देण्यात येत होती. या सर्व कागदपत्रांवर नातेवाईकांनी  स्वाक्षरीही केलेली  आहे. कोविड आय. सी. यू. मध्ये ज्या रूग्णाला जेवन्यासाठी मदत लागते त्यांच्यासाठी  दोन महिला आणि 2 पुरुष कर्मचारी नियुक्त आहेत.   एकूण 3 शिफ्टसाठी 12 कर्मचारी  जेवण आणि पेशंट केअर साठी  कार्यरत आहेत.  शासन निर्णयाप्रमाणे कोविड रूग्णाला बिल आकरण्यात येते. या बिलाचे शासकीय यंत्रणेकडून ऑडिट देखील होते. तरी लाखों रुपये आकारण्याचे  बिनबुडाचे आरोप करण्यात येतात. रुगणांची आर्थिक परिस्थिति लक्षात घेऊन नगर मध्ये एकत्रित एकाच वेळी संपूर्ण रक्कम  अडवांस न घेतल्यानें काही रक्कम डिस्चार्ज च्या वेळी बाकी राहते व ते बिल भरन्यास नातेवाईक नकार देऊन आरोप करतात.
      वास्तविक कोविड उपचारचे दरपत्रकही हॉस्पिटलच्या दर्शनी परिसरात नातेवाईकांच्या  माहितीसाठी लावण्यात आलेले आहे. अशी कुठलीही वस्तुस्थिति जाणून न घेता केवळ हॉस्पिटलच्या  बदनामी चा प्रयत्न करून  मी बिलाचे पैसे कमी करायला भाग पडतो. माझे खुप राजकीय, सामाजिक वजन आहे असे भासवून रूग्णाच्या नातेवाईकांना खोट्या भुलथापा देऊन स्वतःचे उखळ पांढरे करण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत. नियमाप्रमाणे रूग्णावरील  उपचारासंबंधी सर्व मेडिकल रेकॉर्ड उपलब्ध असते. त्यामुळे खोटे आरोप व बदनामी करणार्यानी अगोदर याची शहानिशा करायला पाहिजे. अश्या लोकांमुळे वैद्यकीय सेवा खंडित होउ नये अशी आमची अपेक्षा त्यास आपले सहकार्य आवश्यक  असे आवाहन व खुलासा साईदीप हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.

No comments:

Post a Comment