‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली- सुरेश वाबळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली- सुरेश वाबळे

 स्थैर्यनिधी संघ ‘सहकार मित्र’ पुरस्काराने सन्मानित

‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली- सुरेश वाबळे  

अहमदनगर ः
जिल्ह्यातील पतसंस्थांना पाठबळ देवून संकट मुक्त करणार्‍या अहमदनगर जिल्हा स्थैरनिधी सहकार संघाच्या कामाची दखल घेवून सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करणार्‍या डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ हा  पुरस्कार स्थैर्यनिधी संघाला मिळाला. ही मोठी अभिमानास्पद बाब असून या पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली आहे, असे प्रतिपादन स्थैरनिधी सहकार संघाचे चेअरमन सुरेश वाबळे यांनी केले.

   स्थैर्यनिधी संघाला नुकताच डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ हा  पुरस्कार मिळाला आहे. डोंबिवली येथे छोट्याखाणी कार्यक्रमात संघाचे चेअरमन सुरेश वाबळे व  व्हाईस चेअरमन वसंत लोढा यांनी शरद ओगले यांच्या हस्ते  हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधीचे संचालक शिवाजीराव कपाळे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष उ.म.कर्वे, उपाध्यक्षा सौ.नं.श.कुलकणी, मुख्यव्याव्साथाप्क गो.गी परांजपे आदी उपस्थित होते. रोख 51 हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सतीश मराठे यांनी नगर जिल्ह्यात राबलेला स्थैर्यनिधीचा उपक्रम राज्यातील बँकिंग क्षेत्राला मागर्दर्शक आहे, हा उपक्रम पूर्ण राज्यात राबवावा, असे सांगून स्थैर्यनिधीचे कौतुक केले. सहकारी क्षेत्रातील आर्थिक संस्थांविषयी विश्वास निर्माण करणार्‍या आणि वृद्धीसाठी आधार ठरू शकेल असे आपल्या संस्थेचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आणि अभिनंदनीय आहे. म्हणूनच यावर्षीचा सहकार मित्र पुरस्कार आपल्या संस्थेला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे, असे अध्यक्ष उ.म.कर्वे यांनी सांगितले. काका कोयटे म्हणाले, नगर जिल्ह्यात काही पतसंस्था अडचणीत आल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी व निर्माण झालेले गढूळ वातावरण बदलण्यासाठी या स्थैर्यनिधी संघाची स्थापना केली होती.

No comments:

Post a Comment