भाजपाच्या नगरसेवकांना पदाच्या माध्यमातून विकास कामांसाठी संधी- महापौर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

भाजपाच्या नगरसेवकांना पदाच्या माध्यमातून विकास कामांसाठी संधी- महापौर

 भाजपाच्या नगरसेवकांना पदाच्या माध्यमातून विकास कामांसाठी संधी- महापौर

मनपा सभागृह नेतेपदी भाजपाचे रवींद्र बारस्कर.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गेल्या दोन वर्षामध्ये शहराच्या मुलभूत प्रश्ना बरोबर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभले आहे. भाजप शहर विकासाचा अजेंडा बरोबर ठेवून काम करित आहे. भाजपाच्या नगरसेवकांना पदाच्या माध्यमातून विकास कामासाठी संधी मिळावी म्हणून सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून प्रत्येकाला योग्य त्या पदावर संधी दिली आहे. असे प्रतिपादन बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.
   नगरसेवक रविंद्र बारस्कर म्हणाले की, हापौर बाबासाहेब वाकळे यांनी भाजपाच्या माध्यमातून सभागृह नेते पदाची मला संधी दिली या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मनोज दुलम यांनी सभागृह नेते पदाचा पदभार स्वेच्छेने माझेकडे सुपूर्द केला आहे. विकासाच्या प्रश्ना बरोबर भाजप पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यत पोहचविण्याचे काम करणार आहे.
    शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहामध्ये सर्व पक्षिय नगरसेवकांना बरोबर घेवून जलद गतीने मार्गी लावून असे ते म्हणाले.
    मनपाच्या सभागृह नेते पदाचे नियुक्तीचे पत्र  नगरसेवक रविंद्र बारस्कर यांना महापौर बाबासाहेब वाकळे, यांनी आज प्रदान केल याप्रसंगी सभागृह नेते मनोज दुलम, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, नगरसेवक कुमार वाकळे, रामदास आंधळे, पल्लवी जाधव, संजय ढोणे, सचिन जाधव, सतिष शिंदे, उदय कराळे, पुष्कर कुलकर्णी, दिपक गांगर्डे, गजानन कराळे, बाबासाहेब भिंगारदिवे, निलेश जाधव, शिवा आढाव, शुभम वाकळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment