केडगाव जागरूक मंचच्यावतीने जागरूक पत्रकारिता सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

केडगाव जागरूक मंचच्यावतीने जागरूक पत्रकारिता सन्मान

 केडगाव जागरूक मंचच्यावतीने जागरूक पत्रकारिता सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः केडगांव जागरूक नागरिक मंचाच्या वतीने कोरोना काळात निर्भिडपणे प्रशासनास , राजकारण्यांस सद्यस्थिती बद्दल अवगत करण्यात भाग पाडणारे लेखन तसेच  निष्पक्ष व लोक जागृतीच्या पत्रकारितेबद्दल जागरूक पत्रकारिता  सन्मानाचे वितरण करण्यात आले. मंचच्या वतीने कोरोना काळात करत असलेल्या कामाबद्दल  यामागे पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी ,सफाई कर्मचारी, रूग्णवाहिका सेवा कर्मचारी, अग्निशामक दल कर्मचारी यांचे मनोबल सन्मानाच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न म्हणुन त्यांचा गौरव केला.
    यावेळी केडगाव प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष समीर मणियार, नगर पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड, पत्रकार  प्रकाश चव्हाण, शुभम पाचारणे, भारत पवार,  अमोल गायकवाड, विजय घोगरे, तेजस शेलार, सचिन शिंदे, विक्रम लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक किशोर पाटील होते.
    प्रास्तावीक मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी केले. याप्रसंगी प्रसाद पाटसकर, पुनम तानवडे, जालिंदर शिंदे, अक्षय शिंदे, प्रविण पाटसकर आदि उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment