पर्यावरण पूरक सीएनजी पंपाची संख्या वाढवणार : आदित्य कुमार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

पर्यावरण पूरक सीएनजी पंपाची संख्या वाढवणार : आदित्य कुमार

 एमआयडीसी परिसरात न्यू एज फ्युएल वर्ल्ड येथे नगरमधील पहिल्या ‘सीएनजी’ पंपाचे उद्घाटन

पर्यावरण पूरक सीएनजी पंपाची संख्या वाढवणार : आदित्य कुमार

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकार क्लिन एनर्जी धोरणाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे भारतात सीएनजी इंधनावरील वाहनांची निर्मिती वाढली आहे. लोकांचीही या वाहनांना मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने भारत पेट्रोलियम सीएनजी पंप वाढवत आहे. नगर शहरातील एम आय डी सी परिसर चार चाकी वाहनांच्या शोरुमचा हब आहे. त्यांचा आग्रह तसेच ग्राहकांची सोय लक्षात घेऊन कंपनीने पंधरा वर्षांपासून या परिसरात उत्कृष्ट इंधन विक्री सेवा देणार्या न्यू एज फ्युएल वर्ल्ड येथे सीएनजी पंप सुरू केला आहे. पुणे, नगर, शिर्डी, औरंगाबाद मार्गावर येजा करणार्या वाहनांची चांगली सोय या पंपामुळे होणार आहे. येत्या काळात नगर व औरंगाबाद परिसरात प्रत्येकी 12 ते 15 सीएनजी पंप सुरू करणार आहे, असे प्रतिपादन भारत पेट्रोलियमचे महाव्यवस्थापक आदित्यजी कुमार यांनी केले.
नगर एम आय डी सी पोलिस स्टेशन समोर न्यू एज फ्युएल वर्ल्ड येथे नगरमधील पहिल्याच सीएनजी पंपाचे उद्घाटन आदित्य कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भारत पेट्रोलियमचे मुख्य व्यवस्थापक श्रीपाद मांडके, दिनेश गाडगीळ, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, राजूकाका शेवाळे, स्वराज कामगार संघटनेचे योगेश गलांडे, शंकर शेळके, न्यू एज फ्युएलचे संचालक विकी मुथा व चेतन गुगळे, मनोज अडीगोपूल, विराज केळुसकर, आदित्य त्रिपाठी, बजरंग राठोड, प्रतिक गायकवाड, पंपाचे मॅनेजर जितेंद्र जोशी, अशोक हेकर आदी उपस्थित होते. विकी मुथा यांनी सांगितले की, नगरमध्ये गेल्या काही काळात सीएनजी वरील वाहनांची संख्या वेगाने वाढली आहे. पर्यावरण पूरक व तुलनेने स्वस्त इंधन म्हणून सीएनजी महत्वाचे आहे. वाहने वाढत असताना नगरमध्ये सीएनजी पंप उपलब्ध नव्हता. ही कमी आता न्यू एज फ्युएलने भरून काढली आहे. पुणे-औरंगाबाद, शिर्डी या मार्गावर धावणार्‍या वाहनांसाठी नगरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी सीएनजीची चांगली सोय झाली आहे. आताच्या काळात टाटा मोटर्स सारख्या कंपन्याची  मालवाहतूक, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आता बीएस 6 नुसार सीएनजीवर निर्माण केली जात आहेत. ही वाहने घेणार्यांसाठीही सीएनजी उपलब्धतेची मोठी समस्या दूर झाली आहे.  वाहनधारकांनी न्यु एज फ्युएल वर्ल्डच्या या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here