बूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 7, 2021

बूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी

 बूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः करोनाच्या संकटात गेल्या वर्षापासून नगरच्या बूथ हॉस्पिटलने सामाजिक जाणीवेतून रुग्ण सेवा केली आहे. आताही आलेल्या दुसर्‍या लाटेत त्यांचे हे कार्य अविरतपाने चालू आहे. या कार्यात खारीचा वाटा उचालाच्या दृष्टीने पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी भरीव मदत केली आहे. आपण सर्व एकत्र येत नियमांचे पालन करून या करोना विरोधात लढा देवू, असे प्रतिपादन पंजाबी समाजाचे नूतन अध्यक्ष प्रदीप पंजाबी यांनी केले.
   पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने बूथ हॉस्पिटलला करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रोख आर्थिक मदत, पौष्टिक खाद्यपदार्थ व शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स देण्यात आले. पंजाबी समाजाचे नूतन अध्यक्ष प्रदीप पंजाबी व सिंधी समाजाचे नूतन अध्यक्ष महेश मद्यान यांच्या हस्ते बूथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक मेजर देवदान कळकुंबे यांच्या कडे सर्व मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राकेश गुप्ता, जयकुमार रंगलाणी, मानक भटलाई, सुनील बजाज, मन्नु कुकरेजा, कुमार ग्राबा, मनोज खूपचंदाणी, कानू गोपलाणी, अनिल सबलोक, पंजाबी सेवा समितीचे उपाध्यक्ष हितेश ओबेरॉय, संजय धुप्पड, पियुष जग़्गी, मोहित पंजाबी, डॉ.महेश तिवारी, डॉ. अभिजीत केकान आदी उपस्थित होते.
   यावेळी महेश मद्यान म्हणाले, करोनाच्या पर्दुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण झाले असताना सर्वसामान्य करोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार करून बूथ हॉस्पिटलने मोठे सामाजिक दावित्व निभावले आहे. त्यांच्या या सेवा कार्याला पंजाबी व सिंधी समाजाचे कायम पाठबळ राहील. मेजर देवदान कळकुंबे यांनी पंजाबी व सिंधी समाजाने दिलेल्या मदती बद्दल सर्वांचे आभार मानून सर्व दानशुरणी बूथ हॉस्पिटलला मदत करावी असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here