भिंगार नाल्याचे सुशोभिकरण व ऑक्सिजनयुक्त झाडे लावावेवत : नगरसेवक भागानगरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 1, 2021

भिंगार नाल्याचे सुशोभिकरण व ऑक्सिजनयुक्त झाडे लावावेवत : नगरसेवक भागानगरे

 भिंगार नाल्याचे सुशोभिकरण व ऑक्सिजनयुक्त झाडे लावावेवत : नगरसेवक भागानगरे


अहमदनगर ः
अहमदनगर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आरोग्या संदर्भात चर्चा करीत असताना म्हणाले की, कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांना तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणे आपले कर्तव्य आहे. यासाठी महापालिकेने कोविड तपासणी व उपचार सेंटर वाढवावेत. अनेक रुग्णांची होणारी गैरसोय यामुळे दूर होईल. याचबरोबर शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. सारसनगर, भवानीनगर, विनायकनगर, बुरुडगाव रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. तरी लवकरात लवकर हा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात यावा. भिंगार नाला हा सारसरनगर परिसरातून वाहत आहे. या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नाल्याचे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here