गणपतीची तालिमच्यावतीने शिवजयंतीनिमित्त स्वराज्याचा इतिहास दर्शविणारा देखावा
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली - निलेश खरपुडेनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणापासून शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वत: कष्ट घेतले. पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला. महाराजांनी साध्या-भोळ्या मावळ्यांचे संघटन करुन त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला. स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांना सहभागी करुन घेऊन हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली. या मावळ्यांनीही छत्रपतींप्रती निष्ठा बाळगुन प्रसंगी प्राणांची आहुती दिली. स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांचा परिचय सर्वांना व्हावा, त्यांचे जीवनकार्य समजावे यासाठी तयार केलेला देखावा ज्वलंत इतिहासाची साक्ष देत आहे, असे प्रतिपादन निलेश खरपुडे यांनी केले.
माळीवाडा येथील गणपतीची तालिम च्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांचा इतिहास दर्शविणारा देखावा सादर केला. याप्रसंगी निलेश खरपुडे, रवी नांगरे, विकी खाकाळ, सागर पवार, आशिष खंदारे, केशव मोकाटे, सोनू भुतारे, सुर्यकांत पवार, अभि खंदारे, शाम मोकाटे, अक्षय आंबेकर, राम मोकाटे, कार्तिक आंबेकर, वैष्णव आंबेकर, शुभम भापकर, स्वप्नील नगरे, रोहित साठे, सौरभ जाधव, विशाल उदावंत, सुहास पवार, अक्षय नलगे, यश जाधव आदि उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपस्थितांना सॅनिटायर व मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांचे अनेकांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment