प्रत्येकाने करोना योद्धा बनून शासन नियमांचे तंतोतंत पालन करावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

प्रत्येकाने करोना योद्धा बनून शासन नियमांचे तंतोतंत पालन करावे

 प्रत्येकाने करोना योद्धा बनून शासन नियमांचे तंतोतंत पालन करावे

जय आनंद महावीर युवक मंडळाचे आवाहन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राज्यात करोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  एप्रिल पर्यंत दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू केली आहे. तसेच दर शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी शासन नियमांचे तंतोतंत पालन करावे तसेच पात्र व्यक्तींना करोना प्रतिबंधासाठी लस घ्यावी असं आवाहन जय आनंद महावीर युवक मंडळाने केले आहे.
मंडळाचे सेक्रेटरी हेमंत मुथा यांनी सांगितले की, राज्यात तसेच आपल्या नगर जिल्ह्यात व शहरात करोना बाधितांचे प्रमाण वाढले आहे. ही साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन न लावता सरकारनं अर्थकारणाचा विचार करून सावध पावले उचलली आहेत. महामारी रोखणं ही सरकारची एकट्याची जबाबदारी नाही. प्रत्येकाने स्वतः करोना योद्धा बनून योगदान दिले पाहिजे. आपल्या साठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, प्रशासन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे कुटुंब, परिवार आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने गर्दीत जाणे टाळणे, मास्क नेहमी तोंडावरच बांधणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, सॅनिटाजरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. व्यावसायिक, दुकानदारांनीही  ग्राहकांची गर्दी टाळावी व मास्क असेल तरच ग्राहकांना दुकानात प्रवेश द्यावा. आताचा काळ अतिशय आव्हानात्मक आहे. आपल्या पैकी अनेकांनी करोनाच्या दाहकतेचा अनुभव घेतला असेल. आताच्या परिस्थितीत तग धरणे महत्वाचे आहे. सर सलामत तो पगडी पचास ही गोष्ट लक्षात ठेऊन प्रत्येकाने करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे. आताच्या परिस्थितीत हेच राष्ट्रीय कर्तव्य आहे. तसेच लक्षणं जाणवत असतील तर न घाबरता टेस्ट करून घ्यावी. इतरांना आपल्या मुळे बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महिला मंडळ अध्यक्षा सविता गुंदेचा व सर्व पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here