सर्व प्रकारची दुकाने उघडण्याबाबत मुभा द्यावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 7, 2021

सर्व प्रकारची दुकाने उघडण्याबाबत मुभा द्यावी

 सर्व प्रकारची दुकाने उघडण्याबाबत मुभा द्यावी

सावेडी उपनगर असोसिएशनच्यावतीने निवेदन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर  ः महाराष्ट्र शासन तथा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि.5/04/2021 रोजी दुकानांसंदर्भात आदेश पारित करण्यात आला आहे.त्यानुसार महाराष्ट्रातील आणि आपल्या अ.नगर जिल्यातील अत्यावश्यक वगळता सर्व अस्थापने 30 एप्रिलपर्यंत बंद असा आदेश पारित करण्यात आलेला आहे.
   या आदेशासंदर्भात सावेडी उपनगर असोसिएशनच्या सर्व व्यापार्‍यांच्या भावना लक्षात घेऊन निवेदन मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.महसुलमंत्री , खासदार सुजय विखे साहेब,आमदार संग्राम जगताप साहेब,जिल्हाधिकारी भोसले साहेब ,आयुक्त गोरे साहेब, महापौर वाकळे साहेब, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रमभैय्या राठोड,मेंबर परेश लोखंडे व इतर यांनी वास्तव परिस्थिती या निवेदनात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रेक- द - चेन मोहीम राबवताना व्यापारी वर्गालाही इतरांप्रमाणे विचारात घ्यावे हे सांगण्यासाठी निवेदन दिले गेले.
    व्यापारी वर्ग हा अर्थचक्राला गती देणारा महत्वाचा स्तंभ मानला जातो जर हा स्तंभ कोलमडला तर अर्थचक्र कसे चालणार?
सावेडी हा भाग अहमदनगर शहराचा उपनगर म्हणून ओळखला जातो. उपनगरात व्यवसाय करताना गर्दी होईल अशी परिस्थिती उपनगरात नाही कारण येथे मोठ्या प्रमाणत दुकाने ही रहिवासी संकुलात किंवा स्वतंत्र अश्या स्वरूपाचीच आहे.येथे आज अनेक व्यावसायिक व्यवसाय करून आपला उदाहरण निर्वाह करतात, मागील एक वर्षा पासून कोरोना महामारी काळात सर्व व्यवसाय संकटात सापडलेले आहेत. अश्यातच पुन्हा 25 दिवस दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे अनेक छोटे व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती नाकारता येत नाही.
यश शहा यांनी यावेळी सांगितले की आज व्यापार्‍यांना मालाचे पैसे, दुकानाचे भाडे,लाईट बिल,कामगारांचा पगार,व्यावसायिक कर्जाचे हफ्ते हे सर्व दुकान चालू असो अथवा बंद त्यांना तो द्यावा लागणार आहे.जर दुकान 30 एप्रिल पर्यंत बंद राहिले तर दुकानदार पैसे कसे देऊ शकतील.त्यामुळे दुकानावर अवलंबून असणारे कामगारांचे कुटुंब देखील संकटात येईल.शासन निर्णयात असे दिसते की लग्न कार्यासाठी परवानगी आहे पण लग्न कार्यासाठी आवश्यक असणारे कपडे, दागिने, भांडी, व इतर वस्तू दुकाने बंद असले तर खरेदी कशी करू शकतील अशा अनेक छोट्या मोठ्या वास्तविक बाबींचा आपण नक्की विचार करावा.
तरी आपण वरील सर्व गोष्टींचा सहानभूती पूर्वक व्यापार्‍यांच्या भावनांचा जरूर विचार करून सुधारित आदेश काढावा.
    व्यापारीवर्गास किमान सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत सोमवार ते शुक्रवार व्यापार करण्याची मुभा मिळावी.सर्व व्यापारी बांधव शासनाने जारी केलेल्या कोरोना महामारीच्या सूचना पाळण्यास बंधनकारक आहे.
     व्यापारी वर्ग हा मागील वर्षापासून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत आहे व इथून पुढे ही शासनास सर्व सहकार्य करण्यास तयार आहे.तरी महाराष्ट्र शासन तथा जिल्हाधिकारी साहेबांनी
     अहमदनगर व्यापार्‍यांच्या भावना लक्षात घ्याव्या.हि नम्र विनंती असोसिएशनच्या वतीने शिवाभाऊ चव्हाण,यश शहा, तेजस शहा,संतोष भोजने,यश गांधी, विपुल छाजेड, किशोर मुथ्था, प्रशांत कुलकर्णी, मंगेश निसळ, सचिन बाफना, प्रमोद डोळसे, आनंद पवार, कैलास भोगे, मुकुंद गायकवाड, अविनाश गुंजाळ,ऋषिकेश भागवत,लक्ष्मीकांत वर्मा, पुरोहित व इतर व्यापार्‍यांनी आग्रहपूर्वक मागणी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here