श्रीगोंदा शहरातील शासकीय कोविड सेंटर फुल्ल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

श्रीगोंदा शहरातील शासकीय कोविड सेंटर फुल्ल

 श्रीगोंदा शहरातील शासकीय कोविड सेंटर फुल्ल

मंगल कार्यालये, महाविद्यालयात कोव्हिडं सेंटर करण्याची चाचपणी सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढली असून श्रीगोंदा शहरात नुकत्याच पुन्हा सूरू झालेले शंभर बेडचे शासकीय कोव्हिडं सेंटर पूर्ण क्षमतेने भरल्याने महसूल व नगरपरिषद प्रशासनाने नव्याने कोव्हिडं सेंटर सुरू करण्यासाठी जागेची पहाणी सुरू केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जास्त धोकेदायक असल्याचे तज्ञ सांगत असून तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. शहरात नुकत्याच पुन्हा सूरू झालेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील शंभर बेडचे शासकीय कोव्हिडं सेंटर पूर्ण क्षमतेने भरले असून 103 कोरोना रुग्ण सध्या या कोव्हिडं सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता महसूल व नगरपरिषद प्रशासनाने नव्याने कोव्हिडं सेंटर सुरू करण्यासाठी जागेची पहाणी सुरू केली असून काही मंगल कार्यालये, महाविद्यालये यांची पाहणी करून त्याठिकाणी कोव्हिडं सेंटर सुरू करता येईल का याबाबत चाचपणी सुरू केली असून लवकरच तालुक्यात 500 बेडचे कोव्हिडं सेंटर सुरु करण्याकरता प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment