साजन शुगरचा गळीत हंगाम यशस्वी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

साजन शुगरचा गळीत हंगाम यशस्वी

 साजन शुगरचा गळीत हंगाम यशस्वी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील साजन शुगर प्रा.लि.चा चालू गळीत हंगामाची सांगता समारंभ दि.16 रोजी सकाळी 11 वाजता आमदार बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. चालु गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी वाहतुकदार, व ऊस तोड जुगाड यातील प्रथम तीन अशा एकूण नऊ लोकांचा यामुळे  सन्मान करण्यात आला. त्यामध्ये दादासाहेब पानसरे,रामचंद्र  रायकर,सुदाम पवार,भाऊसाहेब भिसे,नामदेव राठोड,बापु इथापे,अरुण राठोड,गणेश गैद, सलतान पवार, साईराज राठोड, पंडीत राठोड,बाळासाहेब सोनवणे, यांच्यासह अनेकांना स्मृतीचिंन्ह,प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणाले या भागातील जनतेच्या आग्रहास्तव कारखाना उभा केला उभारणीसाठी पैसा नसताना सामान्य जनेतेने पाच हजारा पासुन ते  वीस लाखापर्यंत मदत केली. याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे कारखान्याचे मालक आम्ही नसुन तुम्ही आहात काम करताना संकटे अनेक परंतु संकटावर मात करत अडचणी दूर करत गेलो आता मागे पाहु नका.भविष्यकाळाचा विचार करून पुढे ध्येय गाठायचे आहे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र राहुन कामातुन सर्वसामान्य जनतेला न्याय दयाचा आहे. काहीं हितचितकांनी टिका केली विश्वास ठेवला नाही पण यंदा साजन शुगरने उस उत्पादकाना चांगला बाजारभाव देऊन विश्वास सपादन केला . यंदा हिरडगाव युनिट बंद ठेवले पण पुढील हंगामात दोन्ही युनिट चांगल्या पद्धतीने चालवून यशस्वी हंगाम पूर्ण करतील या हंगामात साजनच्या नेतृत्वा खाली चांगले काम करणार्‍यांचे  कौतुक केले . अशीच कौतुकाची थाप कायम पाठीशी राहीन असे पाचपुते यांनी यावेळी व्यक्त केले .
यावेळी प्रास्ताविक करताना कारखान्याचे जनरल मॅनेजर आर टी यादव यांनी चालु हंगामात प्रतिकुल परिस्थिती असुन सुद्धा  उस उत्पादक शेतकरी, उसतोड कामगार वहातुक कंत्राटदार अधिकारी कामगार या सर्वानी परिश्रम घेतले म्हणूनच आज आपण तीन लाख दहा हजार मेट्रीक टन साखरेचे उत्पादन करून  सर्वांच्या सहकार्यामुळे स्वः सदाशिव(आण्णा)पाचपुते यांची इच्छा पुर्ण केली हीच खरी अण्णांना श्रद्धाजंली ठरली.
यावेळी साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते  उद्योजक प्रदीप मगर  वृद्धेश्वर मल्टिस्टेटचे अध्यक्ष विठठलराव वाडगे बबनराव राहींज सुदाम पवार  नारायण  टिमुणे . ज्ञानदेव पाचपुते यांच्यासह तालुक्यातील उस उत्पादक वहातुकदार, तोडणीदार कामगार, अधिकारी यांच्यासह मान्यवर व्यक्ती शासनाचे नियमाचे पालन करून हजर होते. यावेळी प्रास्ताविक रोहीदास यादव सुत्रसंचलन संतोष गुंड शेवटी आभार नवनाथ देवकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here