दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्यात

 दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्यात

ऑनलाईन सर्वेक्षण करून शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घेण्यात याव्यात असे मत एकूण 70 टक्के पालकांनी ऑनलाइन सर्वेक्षणात मांडले आहे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने याबाबत ऑनलाइन सर्वेक्षण सर्वेक्षणाबाबत लिंक तयार करून ती सर्व ग्रुप वर तसेच विविध सोशल मिडियावर पाठवली होती  या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे सदर  मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबईच्या वतीने मुख्यमंत्री मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर,कार्यवाह शिवनाथ दराडे,खजिनदार सुहास नाकती तसेच संघटन विभाग प्रमुख सुहास हिर्लेकर  यांनी याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती
शेवगांव शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी सांगितले आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वेळोवेळी विद्यार्थी व शिक्षकांची हित जोपासत असताना सध्या धोरणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी व सुरक्षितता विद्यार्थी व पालक त्यांची सुरक्षितता लक्षात घेता या बाबत  ऑनलाइन सर्वेक्षण याबाबत केले आहे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आर्टि - पीसीआर तपासणी करणे, परीक्षा केंद्रावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करावी आवश्यक ती वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात यावी अशी भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.या दृष्टीने शिक्षक परिषद मुंबई विभागाच्या वतीने ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले होते.यामध्ये पालक - विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी मते मांडले आहेत.यामध्ये 70 टक्के पालकांनी परीक्षा पुढे ढकलून ती जून किंवा जुलै महिन्यात घेण्यात येईल यामध्ये 46 टक्के शिक्षक 12 टक्के पालक तसेच विद्यार्थी व नागरिक हे 40 टक्के आहेत. जून महिन्यात परीक्षा घेण्याचे मध्ये 40टक्के लोकांनी तर ते 30 टक्के लोकांनी जुलै महिन्यामध्ये घेण्यात यावी तसेच 25 टक्के पालकांनी एप्रिल महिन्यात किवा  मे महिन्यात घेण्यात यावी,असे मत नोंदवले आहे तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा जून मध्ये घेण्यात याव्यात असे मत शिक्षक परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने वरील मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा असे मत शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते,नाशिक विभाग अध्यक्ष सुनिल पंडित,जिल्हाध्यक्ष सखाराम गारुडकर,शरद दळवी जिल्हा सचिव चंद्रकांत चौगुले,तुकाराम चिक्षे,किशोर दळवी,अनिल आचार्य,अरविंद आचार्य,शशिकांत थोरात,विनायक कचरे,सतिश जगदाळे,बाबासाहेब बोडखे,सत्यवान थोरे,प्रदिप बोरुडे,किरण शेळके,संदिप झाडे,कारभारी लोणारी,राहुल ज्योतिक,रविंद्र पवार,बाळासाहेब घावटे,अमृत गोरे,देवीप्रसाद जोशी,ज्ञानदेव वंजारी,अनिल दरंदले,निलेश मोरे,कन्हैया भंडारी,अनिल ससाणे,शहाजहाँन शेख,सचिन शिरसाठ आदी पदधिकार्यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment