राहुरी महसूल विभाग वसुलीत अव्वलस्थानी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

राहुरी महसूल विभाग वसुलीत अव्वलस्थानी

 राहुरी महसूल विभाग वसुलीत अव्वलस्थानी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्यांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात कोरोना महामारी लॉकडाउन व तालुक्यात वाळू लिलाव झालेले नसतानाही राहुरी महसूल विभागाने या आर्थिक वर्षात 95 टक्के महसूल वसुली करून अव्वल स्थान मिळवले आहे .
2020-21 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयाने राहुरी महसूल विभागाला 15 कोटी 40 लाख रुपयांचे महसुली उद्दिष्ट दिलेले होते . राहुरी महसूल विभागाने 31 मार्च 2021अखेर 14 कोटी 56 लाख 64 हजार रुपयांची रगड महसूल वसुली केली आहे . श्रीरामपूर विभाग , नगर व नाशिक विभागातील ही वसुली अव्वल स्थानावर आहे . गेल्या दहा ते बारा वर्षांपासून राहुरी तालुका महसूल विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी तालुक्याला 7 ते 8 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात येत होते, यंदा 15 कोटी 40 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते .
राहुरी तालुक्यात मुळा नदी पात्रात 20 ते 22 वाळूपट्टे आहेत तर प्रवरा नदीपात्रात 14 ते 16 वाळूपट्टे आहेत. राहुरी तालुक्याचा वाळूव्यवसाय आर्थिक सुबत्तेचे बरोबरच रक्तरंजित ही मानला जातो. मात्र अलीकडच्या काळात महसूल पोलिस आणि स्थानिक गब्बर पुढारी व कथित सामाजिक कार्यकर्ते यांच्या बेकायदेशीर संबंधांमुळे वाळू व्यवसाय बदनाम झाला , आणि आता लिलावाला ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे दिसते . आणि आता जिल्हा महसूल प्रशासनाला पाचव्यांदा वाळू लिलावची ई निविदा जाहीर करण्याची नामुष्की येते ! हे विशेष आहे .
राहुरी तालुक्यातील चोरटी वाळू वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे . जेसीबी मशीन, वाळू चाळणी, विजेची उपकरणे ,डंपर व स्थानिक बेरोजगार युवकांना हाताशी धरून ही तस्करी जोमात सुरू आहे. पोलिस व महसूल यंत्रणा याबाबत हतबल झालेली आहे. पूर्वीसारखे बाहेरील विशेष पथकही अचानक छापा टाकत नसल्याने वाळू तस्करी आलबेल असल्याचे सध्याचे चित्र आहे .
अशा परिस्थितीत राहुरी महसूल विभागाने गौणखनिज विभागाला 12 कोटी रुपये उद्दिष्ट दिले असताना 10 कोटी 89 लाख एकूण 69 हजार रुपयांची वसुली केली आहे . जमीन महसूलचीही 85 टक्के वसुली झाली आहे. यात राहुरी महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, सर्कल, तलाठी व कर्मचार्‍यांचा मोलाचा वाटा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here