व्हर्चुअल क्लासरुममुळे कृषि शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः केंद्रिय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

व्हर्चुअल क्लासरुममुळे कृषि शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः केंद्रिय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर

 व्हर्चुअल क्लासरुममुळे कृषि शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः केंद्रिय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः व्हर्चुअल क्लासरुम आणि अ‍ॅग्री-दिक्षा वेब एजुकेशन चॅनलमुळे कृषि शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे. देशातील आणि परदेशातील कृषि शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचे व्याख्याण देशभरातील कृषि पदवीधरांना एकाच प्लॉटफॉर्मवर बघता येणार आहे. हे व्हर्चुअल क्लासरुम म्हणजे कोरोनाच्या या आपत्तीचे ईष्ट आपत्तीमध्ये आपण रुपांतर केले आहे असे प्रतिपादन केंद्रिय कृषि व किसान कल्याण, ग्रामीण विकास व पंचायती राज मंत्री ना. श्री. नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.

भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात एकुण 18 कृषि विद्यापीठे आणि भारतीय कृषि अनुसंधान अंतर्गत संस्थांना व्हर्चुअल क्लासरुम देण्यात आल्या आहे. या व्हर्चुअल क्लासरुमचे केंद्रिय कृषि व किसान कल्याण, ग्रामीण विकास व पंचायती राज मंत्री ना. श्री. नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रिय कृषि व किसान कल्याण राज्य मंत्री ना. श्री. पुरुषोत्तम रुपाला, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव (डेअर)  व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र, डेअरचे विशेष सचिव आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सचिव श्री. संजय कुमार सिंह, रा.ऊ.कृ.प.चे राष्ट्रीय निदेशक आणि भा.कृ.अ.प.चे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर.सी. अग्रवाल, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, भा.कृ.अ.प.चे निदेर्शक डॉ. राजेंद्र प्रसाद, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे ऑनलाईन उपस्थित होते.
ना. श्री. नरेंद्र सिंह तोमर पुढे म्हणाले भारत हा कृषि प्रधान देश असून कृषि क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या कृषि क्षेत्राचा आधार शेतकरी आणि कृषि शास्त्रज्ञ आहे. कृषि पदविधरांनी कृषि उद्योजक व्हावे. कृषिच्या ज्ञानाचा शेतकर्यांमध्ये प्रसार करावा आणि कृषिमधिल नवनविन संकल्पना घेवून संशोधन करावे. यावेळी केंद्रिय कृषि व किसान कल्याण राज्य मंत्री ना. श्री. पुरुषोत्तम रुपाला म्हणाले या कोव्हीड-19 परिस्थितीमध्येसुध्दा ऑनलाईन प्रणालीमुळे शिक्षण थांबलेले नाही. आजकालचे विद्यार्थी भाग्यशाली आहे कारण त्यांना अद्ययावत ऑनलाईन शिक्षण प्रणालीतुन शिक्षण मिळत आहे. या विद्यार्थ्यांनी  व्हर्चुअल क्लासरुमचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा. महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी व्हर्चुअल क्लासरुमसंबंधी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यात फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये हे व्हर्चुअल क्लासरुम देण्यात आलेले आहे. या व्हर्चुअल क्लासरुममध्ये जे व्यख्याण घेतले जाते ते एकाच वेळेस वेबकास्ट करुन भारतात सर्व ठिकाणी बघणे शक्य होते. या व्हर्चुअल  क्लासरुममध्ये घेतेलेले लेक्चर अ‍ॅग्री-दिक्षा वेब इजुकेशन चॅनलवर केव्हांही बघणे शक्य होते. याप्रसंगी पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, निम्नस्तर कृषि शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाची व्यवस्था व्हर्चुअल क्लासरुमचे नोडल अधिकारी डॉ. एम.आर. पाटील यांनी केली. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध कृषि विद्यापीठाचे कुलगुरु, संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मानले.

No comments:

Post a Comment