जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रयत्न: राज्य मंत्री तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रयत्न: राज्य मंत्री तनपुरे

जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रयत्न: राज्य मंत्री तनपुरे


पाथर्डी :
कोरोनाच्या संकटात राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे.अहमदनगर जिल्ह्यात साधारपणे ४० टन ऑक्सिजन बाहेरून आण्यात येतोय, तेवढा पुरेसा नाही.यासाठी मोठी धावपळ प्रशासनाची होत आहे.४०० लिटर पर मिनिट ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅन्ट जिल्हा रुग्णालयात उद्या पर्यंत कार्यान्वित होईल. त्यावर पालक मंत्री हसन मुश्रीफ ,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आम्ही सर्व त्यावर लक्ष ठेऊन हे काम जाबदारीने पार पाडत असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती दिली .पाथर्डी तालुक्यातील कोरोना बाबतचा आढावा घेतांना त्यांनी पत्रकारांना माहिती दिली . 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे,माजी नगरसेवक चांद मणियार,प्रांताधिकारी देवदत्त केकाण,तहसिलदार शाम वाडकर,गटविकास अधिकारी शितल खिंदे,तालुका आरोग्याधिकारी भगवान दराडे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कराळे,पोलिस निरीक्षक  जोंधळी आदी उपस्थित होते .पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ,शिराळ चिचोंडी येथील कोव्हीड केअर सेंटर तर पाथर्डी शहरातील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी महसूल आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. 

पुढे बोलतांना तनपुरे म्हणाले,कोरोनाची परिस्थिती बिकट झाली आहे.गरज असल्यास घराबाहेर पडावे,विनाकारण कोणी हि बाहेर पडू नये.सरकारने जे निर्बंध घालून दिले आहे त्याची कडक अंमलबजावणी करावी.शासनाने लग्न सोहळ्यास पंचवीस लोकांना परवानगी दिली आहे.पंचवीस एवंजी सहव्वीसावा माणूस आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करा तो माझा किंवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असुद्या त्यावर कारवाईच करावा अश्या सक्त सूचना तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment