लसीकरणासाठी बाजार समिती लाखाची मदत देणार : गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

लसीकरणासाठी बाजार समिती लाखाची मदत देणार : गायकवाड

 लसीकरणासाठी बाजार समिती लाखाची मदत देणार : गायकवाड

प्रशासनाला मिळाला मदतीचा हात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावावर प्रशासनाने मात करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, पारनेर तालुक्यातील नागरिकांना तात्काळ लसीकरणाची सोय व्हावी. म्हणून पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासनास एक लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
पारनेर बाजार समितीमार्फत सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. कोरोना संकटकाळातही प्रशासनास मदत व्हावी. यासाठी नफ्यातून दोन लाख रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यातील एक लाख रुपये लसीकरणासाठी देण्यात येणार आहे. विशेषतः कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी
तालुक्यातील नागरिकांसाठी ही मदत वापरण्यात यावी अशी अपेक्षा संचालक मंडळाने व्यक्त केलेली आहे. तालुक्यात मुंबई-पुण्याहून अनेक नागरिक वास्तव्यास आलेले आहेत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील नागरिकांचे तातडीने लसीकरण झाल्यास भविष्यातील कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तालुका प्रशासन कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. त्यास हातभार म्हणून लसीकरणासाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान लसीकरणासाठी आवश्यक लसी उपलब्ध होणार असतील. तर एखाद्या कोव्हीड सेंटरला ही मदत देण्यात यावी. अशी सूचना ही जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान सभापती प्रशांत गायकवाड यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क करून बाजार समितीच्या नफ्यातून करण्यात येणार्या मदतीस शासनाची परवानगी देण्याची विनंती केली. त्यावर मंत्री पाटील यांनी या प्रस्तावा संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले. मदत देण्यासंदर्भात शासनाने परवानगी द्यावी. यासाठी सभापती गायकवाड यांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्कनंतर कोरोनाच्या आजारातून बाहेर लवकर पडा. अशा शुभेच्छा दिल्या व प्रकृतीची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या.

No comments:

Post a Comment