बाबासाहेबांचे विचार समाजासाठी आदर्श : सरपंच संजीवनी आंधळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

बाबासाहेबांचे विचार समाजासाठी आदर्श : सरपंच संजीवनी आंधळे

 बाबासाहेबांचे विचार समाजासाठी आदर्श : सरपंच संजीवनी आंधळे

कर्जुले हर्या येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणारे भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली.  यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कर्जुले हर्याच्या आदर्श सरपंच संजीवनी आंधळे  बोलताना म्हणाल्या की  भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांसाठी मोठे काम केले आहे.  त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपण सर्वांनी नेहमी आदर्श मानले पाहिजे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here