शेतकऱ्यांकडून वृद्धाश्रमाला धान्याचे वाटप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 29, 2021

शेतकऱ्यांकडून वृद्धाश्रमाला धान्याचे वाटप.

 शेतकऱ्यांकडून  वृद्धाश्रमाला धान्याचे वाटप.



नगरी दवंडी

नेवासा- नेवासाफाटा येथील शरणपूर या वृद्धाश्रमाला नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथील शेतकऱ्यांकडून धान्य व किराणा साहित्याच्या रूपाने मदतीचा हात देण्यात आल्याने कोरोनाच्या या संकटकाळी वृद्ध मातापित्यांना मोठा आधार मिळाला आहे.

खडकाफाटा येथील शरद भांगे यांच्या वस्तीवर गोळा झालेले धान्य व किराणा साहित्य नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते शेतकऱ्यांनी वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी शरद भांगे, भरत भांगे, मच्छिंद्र मुटकुळे, देविदास महाराज पवार, सतीश क्षीरसागर, समृद्धी भांगे, वृद्धाश्रम कमिटी अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, व्यवस्थापक संतोष मगर, पोलीस स्टेशनचे 

दिलीप कु-हाडे, अमोल मगर, आशिष गायकवाड उपस्थित होते. वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांसाठी खडकाफाटा पंचक्रोशीतील शेतकरी नेहमी सहकार्य करत राहतील, प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदान केले जाईल अशी ग्वाही शरद भांगे यांनी यावेळी बोलताना दिली.

शेतकऱ्यांच्या या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी कौतुक केले. कोरोनाच्या या संकटकाळी वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांच्या सेवेसाठी शेतकऱ्यांनी केलेली मदत भूषणावह बाब असून त्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना धन्यवाद देत वृद्धाश्रमाला दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

यावेळी भांगे पाटील परीवाराच्या वतीने पोलीस निरीक्षक विजय करे व वृद्धाश्रम अध्यक्ष रावसाहेब मगर यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment