निमगाव वाघा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

निमगाव वाघा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 निमगाव वाघा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जयंती निमित्त गावात स्वच्छता अभियान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
निमगाव वाघा (ता. नगर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. निमगाव वाघा ग्रामपंचायतमध्ये तसेच नवनाथ विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच गावात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पिंटू जाधव, दिपक जाधव, लहानबा जाधव आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, वंचित घटकातील समाजाला डॉ.बाबासाहेबांच्या घटनेमुळे प्रतिष्ठा व सन्मानाची वागणुक मिळाली. वंचितांच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. आज कोरोनाच्या संकटकाळात त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन गोर-गरीबांना आधार देण्याची गरज आहे. बाबासाहेबांचे विचार आजही सर्व समाजाला दिशादर्शक असून, त्यांच्या विचाराने समाजात कार्य केल्यास हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळ जाधव यांनी निरोगी वातावरणासाठी गावात स्वच्छता असणे आवश्यक असून, सार्वजनिक स्वच्छतेचा संकल्प करण्याचे त्यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment