अवकाळी पावसाने काल दिला नगरकरांना थंड गारवा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 15, 2021

अवकाळी पावसाने काल दिला नगरकरांना थंड गारवा...

 गारवा. वार्‍यावर भिरभिर पारवा. नवा नवा प्रिये... गारवा... नवा नवा.

अवकाळी पावसाने काल दिला नगरकरांना थंड गारवा...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गारवा.. वार्‍यावर भिरभिर पारवा.. नवा,नवा प्रिये... नभातही.. चांदवा नवा नवा.. गारवा.. पाण्यावर सर सर सर काजवा.. नवा नवा.. प्रिये... मनात ही ताजवा.. नवा नवा.. हे प्रेमवीरांच्या युगलगीतांची आठवण व्हावी असा गारवा काल अवकाळी पावसाने नगरकरांनी अनुभवला. अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण होणारे नागरिकांना कालचा पावसाने थंडगार दिलासा दिला.
नगर शहर, उपनगर तसेच तालुक्याच्या काही ठिकाणच्या ग्रामीण भागात काल सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. 10 ते 15 मिनिटे अवकाळी पाऊस पडल्याने सखल भागात बर्‍यापैकी पाणी साचले होते. अवकाळी पावसाने वातावरणातील उकाडा नाहीसा होवून गारवा निर्माण झाला. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. प्रचंड उकाडा निर्माण झाला. पण काही क्षणातच पाऊस सुरू झाला मोठ्या प्रमाणात वाराही वाहू लागला. दुपारी 5 नंतर अवकाळी पाऊस पडेल असेच वातावरण निर्माण झाले होते. सुसाट वारा वाहिल्यानंतर सायंकाळी 6.15 च्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. नगर शहर व उपनगरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. तालुक्याच्या ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस पडला असल्याचे वृत्त आहे.हवामान खात्याने आठ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. यापूर्वीही हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या होत्या. कालच्या अवकाळी पाऊस 10 ते 15 मिनिटे झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here