“साफसफाई”साठी मनपाने मागविली, आधुनिक तंत्रज्ञान युक्त “साफसफाई मशीन” - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

“साफसफाई”साठी मनपाने मागविली, आधुनिक तंत्रज्ञान युक्त “साफसफाई मशीन”

 “साफसफाई”साठी मनपाने मागविली, आधुनिक तंत्रज्ञान युक्त “साफसफाई मशीन”

1 दिवसात 60 किलोमीटर रस्ता होणार कचरामुक्त.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपाच्या घंटागाड्या शहरातील कचरा उचलत आहेत. पण घनकचरा विभागातील कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे शहरात कचर्‍याचे मोठे ढिग तसेच राहत आहेत. यामुळे मनपा प्रशासनाने शहरातील कचरा, धूळ, गोळा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेली साफसफाई मशीन मागविले आहे. एका तासात 8 किलोमीटर ची साफसफाई ही मशीन करू शकणार आहे. चॅलेंजर सुपर प्राव्हेट लिमिटेड कंपनीच्या मशीनची पारिजात चौक येथे प्रायोगिक तंत्रावर साफसफाई करण्यात आल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

यामशिनने पारिजात चौक परिसरामध्ये रस्त्यावरील साफ सफाई केल्यानंतर रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य कमी झाल्याचे दिसून आले. या मशिनद्वारे रस्त्यावर पाणी मारण्याची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही बाजूने साफ सफाई करण्याची सुविधा असल्यामुळे फुटपाथही साफ करता येणार आहे.
महापौर वाकळे याप्रसंगी म्हणाले की, स्वच्छ सुंदर हरित शहर करण्यासाठी गेली दोन वर्षापासून स्वच्छते संदर्भात प्रयत्न सुरू केल्यामुळे स्वच्छ भारत अभियानामध्ये नगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे आताही यावर्षी फाईव्ह स्टार मानांकनासाठी स्वच्छतेचे काम केले आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होत आहे. दिवसें दिवस मनपाच्या घनकचरा विभागातील कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यास उशीर होत आहे.यासाठी नगर शहरातील कचरा, धुळ, गोळा करण्यासाठी झाडू सफाई मशिन लवकरच शहरात काम करणार आहे. ही मशिन आधुनिक तंत्रज्ञानाची असून एक तासामध्ये सुमारे आठ कि.मी. रस्त्याची साफसफाई करणार आहे.
पारिजात चौक येथे चॅलेंजर सुपर प्राव्हेट लि. कंपनीची आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्त अशी झाडू सफाई मशिनद्वारे प्रायोगिक तत्वावर साफ सफाईची पाहणी  करताना आ.संग्रामभैय्या जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, सभागृह नेते रविंद्र बारस्कर, नगरसेवक स्वप्निल शिंदे, रामदास आंधळे, उपायुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, भाजपा प्रसिध्दी प्रमुख अमित गटणे, सचिन जगताप, उदयोजक रोहन सानप, विनोद पाचारणे, ऋषिकेश देशमुख, प्रशांत चौधरी, महेश कुर्‍हे, शिवा आढाव, शुभम वाकळे आदी उपस्थित होते.

दिवसे दिवसे मनपाचे स्वच्छता कर्मचारी सेवा निवृत्त होत असल्यामुळे साफ सफाईसाठी कर्मचारी कमी पडत आहेत. नगर शहराचा विस्तार दिवसे दिवस वाढत असल्याने लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळै आधुनिक तंत्रज्ञानाची झाडू सफाई मशिनची अत्यंत गरज आहे. ही मशिन मुंबई पुना , इंदोर , अहमदाबाद ,सुरत ,नाशिक, या मनपात काम करित आहेत. आता ही मशिन नगर शहरातही दाखल होणार आहे. या मशिनद्वारे सुमारे 50 ते  60 कि.मी. रस्त्यांची साफ सफाई केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवरील साफसफाईचा ताण कमी होणार आहे. हया मशिनद्वारे साफ सफाई केलेला कचरा डंम्पिगद्वारे घंटागाडीत टाकण्याची सुविधा आहे. - अविनाश घुले, सभापती स्थायी समिती

No comments:

Post a Comment