स्कायब्रिजचा दिमाखदार गृहप्रकल्प नगर शहराचे वैभव वाढवणारा : मयुर कोठारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

स्कायब्रिजचा दिमाखदार गृहप्रकल्प नगर शहराचे वैभव वाढवणारा : मयुर कोठारी

 स्कायब्रिजचा दिमाखदार गृहप्रकल्प नगर शहराचे वैभव वाढवणारा : मयुर कोठारी

बुरुडगाव रोडवरील आनंदधामजवळील स्कायब्रिज गृहप्रकल्पाच्या दुसर्‍या फेजचे भूमीपूजननगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरमधील पवित्र आनंदधामपासून पाच मिनिटाच्या अंतरावर बुरुडगाव रोडवर साकारण्यात येणारा स्कायब्रिज गृहप्रकल्प आनंददायी वास्तव्याची हमी देणारा ठरेल. येथील सोयीसुविधा, दर्जा पाहता मोठ्या महानगरातील उच्च दर्जाच्या राहणीमानाची अनुभूती प्रत्येकाला मिळेल. नगर शहराच्या वैभवात भर घालणारा हा दिमाखदार प्रकल्प शहराची एक वेगळी ओळख निश्चितच निर्माण करेल. हक्काच्या सुंदर घराच्या प्रतिक्षेत असलेल्यांना येत्या गुढीपाडव्याला याठिकाणी बुकींग करून शुभकार्याची मुहूर्तमेढ रोवता येईल असा विश्वास आर्किटेक्ट मयुर कोठारी यांनी व्यक्त केला.
बुरुडगाव रोडवर आनंदधाम पासून पाच मिनिटांच्या अंतरावर साकारत असलेल्या स्कायब्रिज गृहप्रकल्पाच्या दुसर्या फेजच्या कामाचे भूमीपूजन करोना नियमावलीचे पालन करून आर्किटेक्ट कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिल (बाळूशेठ) गुगळे, गोतम मुथा, प्रमोद डागा, संजय पिपाडा, स्कायब्रिजचे संचालक मुकेश छाजेड, सिध्दांत छाजेड उपस्थित होते. सुनिल (बाळूशेठ)गुगळे म्हणाले की, आचार्यश्रींचे समाधीस्थळ असलेल्या पावन भूमीपासून अतिशय जवळ स्कायब्रिज हा गृहप्रकल्प साकारत आहे. पुण्या,मुंबईच्या धर्तीवर अतिशय देखणा व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा हा गृहप्रकल्प विलोभनीय ठरेल यात शंकाच नाही. या प्रकल्पात घर असलेल्यांना वेगळाच अभिमान वाटेल. सिध्दांत छाजेड यांनी सांगितले की, स्कायब्रिज गृहप्रकल्प अतिशय आलिशान व भारतीय वास्तूशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक फ्लॅटसाठी वास्तूशास्त्राचा आधार घेण्यात आला आहे. दर्जा, नियोजन व किंमतीचा त्रिवेणी संगम साधत याठिकाणी 2,3,4 बीएचके फ्लॅटस, कार्पेट एरिया उपलब्ध आहेत. या प्रकल्पात प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र व प्रशस्त एंट्रन्स लॉबी आहे. त्यामुळे प्रत्येक परिवाराची प्रायव्हसी तितकीच जपली जाईल. याशिवाय सुरक्षेचीही संपूर्ण काळजी घेणारे सिक्युरिटी ऍपही असणार आहे. सोसायटीचे आवारही अतिशय प्रशस्त व सुरक्षित गेटेड असणार आहे. या गृहप्रकल्पात फ्लॅटधारकांसाठी स्विमिंग पूल, इमारतीच्या गच्चीवर स्काय थिएटर, लहानमोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त व सुसज्ज क्लब हाऊस आहे. याशिवाय नगरमध्ये प्रथमच गृहप्रकल्पात स्काय वाक तसेच स्काय गार्डनची लक्झुरी या प्रकल्पात असणार आहे. लॅण्डस्केप गार्डन फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच बच्चे कंपनीला खेळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पण अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आलिशान व पवित्र वास्तव्याची हमी या प्रकल्पामुळे मिळणार आहे. इच्छुकांनी प्रत्यक्ष साईट व्हिजीट करून या सुंदर गृहप्रकल्पात बुकींग करावे असे आवाहन स्कायब्रिजतर्फे करण्यात आले आहे. ऍपाइंटमेंट व व्हिजीटसाठी संपर्क - 9090631010

No comments:

Post a Comment