समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी केले - संभाजी कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी केले - संभाजी कदम

 समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी केले - संभाजी कदम

शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो घेईल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे ते समाज बांधवांना सांगत.  शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टया सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो, अशा व्यापक दृष्टीकोनातून समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी केले आणि त्यामुळे समाज सुशिक्षित होऊन लागला आहे, असे प्रतिपादन शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम  यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौन्दर, गट नेते संजय शेडगे, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, संतोष गेनपा, बबलू शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी महापौर भगवान फुलसौंदर  म्हणाले, प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे डॉ.बाबसाहेब आंबेडकर नेहमी संगत.  मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत., समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे, असे त्यांचे मत होते. याप्रसंगी संजय शेंडगे, संतोष गेणपा, दत्ता कावरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here