पथदिवे,कचरा, बिगारी कर्मचारी, जिजामाता उद्यानच्या विषयावर चर्चा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

पथदिवे,कचरा, बिगारी कर्मचारी, जिजामाता उद्यानच्या विषयावर चर्चा..

 पथदिवे,कचरा, बिगारी कर्मचारी, जिजामाता उद्यानच्या विषयावर चर्चा..

स्थायी समितीची बैठक संपन्न...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचे अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत उपायुक्त डांगे, पठारे  शिवसेनेचे सचिन शिंदे ,प्रशांत गायकवाड वगळता सर्व सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. भाजपाचे मनोज कोतकर आजारी असल्यामुळे त्यांनी फोन द्वारे चर्चेत भाग घेतला.  या बैठकीत शहरातील पथदिवे ,शहरात जागोजागी असणारे कचर्‍याचे ढीग, बिगारी कर्मचारी या विषयावर चर्चा झाली.
नगरसेवक शाम नळकांडे यांनी शहरात घंटागाडीद्वारे रोज कचर्‍याचे संकलन होत असले तरी नगर शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग आहेत या प्रश्नात लक्ष घालण्याचे आव्हान केल्यानंतर पालिका उपायुक्त डांगे यांनी उद्यापासून हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले.
मनोज कोतकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले असुन तसेच महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच कॉलनी अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट केले. मनपाच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीसाठीची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र ती निविदा प्रक्रिया न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे शहरातील जनतेला किती दिवस अंधारात रहावे लागेल, हे सांगता येणार नाही. त्यासाठी न्यायालयामध्ये महापालिकेने सक्षमपणे बाजू मांडून निविदा प्रक्रियेला चालना द्यावी किंवा महापालिकेने स्वतः बंद असलेले पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे ही मागणी केली.
तसेच सभापती अविनाश घुले, जल अभियंता परिमल निकम व पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांनी बैठकीच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करीत आहेत, याबद्दल  त्यांचे आभार मानले. केडगावमध्येही गेल्या 10-12 दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, तरी या भागातील पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी ही नगरसेवक मनोज कोतकर यांनी स्थायी समितीच्या सभेमध्ये केली.
अहमदनगर महानगरपालिकेतील बिगारी कर्मचार्‍यांचा प्रश्न सोनाबाई शिंदे यांनी उपस्थित केला. आपल्याकडे 442 बिगारी कर्मचारी आहेत त्यामधून 109 कर्मचारी जे ठेकेदार मार्फत घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आलेला आहे 442 कर्मचारी पैकी 109 कर्मचारी घेण्यात यावे तसेच काही कर्मचारी बिगर कामाचे आहे जेथे आवश्यकता आहे उदा. पंपिंग स्टेशन तेथे ठेवण्यात यावे काही कर्मचारी चे मानधनावर आहे ते कमी करण्यात यावे तसेच 442 कर्मचारी पैकी जे कर्मचारी क्लार्क चे काम करतात त्यांना नियमानुसार प्रोमोशन देण्याची मागणी त्यांनी केली.
प्रकाश भागानगरे यांनी आनंदधाम ला भेट देण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. आनंदधाम शेजारील जिजामाता उद्यानात अंधार असल्यामुळे अनेक गैरप्रकार होत आहेत. यासाठी हे उद्यान बीओटी तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याची गरज असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment