लाच मागितली! सहाय्यक निबंधकावर जिल्हा अँण्टीकरप्शनची कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

लाच मागितली! सहाय्यक निबंधकावर जिल्हा अँण्टीकरप्शनची कारवाई.

 लाच मागितली! सहाय्यक निबंधकावर जिल्हा अँण्टीकरप्शनची कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
पतसंस्थेमध्ये सोनेतारण ठेवणार्‍या नागरिकांवर पतसंस्थेने कर्जवसुलीसाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर सहकारी पतसंस्था फेडरेशनवर कर्जवसुली कारवाई अपेक्षित असताना सहाय्यक निबंधकांनी या नागरिकांच्या बाजूने निकाल देवून लाच मागितली. 50 हजारांची लाच स्वीकारत असताना अँण्टीकरप्शन विभागाने कायनेटिक चौकातील एका हॉटेलात सहाय्यक निबंधकासे रंगेहात पकडले. अहमदनगर एसबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सुदाम लक्ष्मण रोकडे असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी एका पतसंस्थेकडुन 2014 मध्ये सोने तारण ठेऊन 30,000,00/- कर्ज घेतले होते. संबधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता . तक्रारदार यांनी न्यायालयाचे आदेशानुसार पतसंस्थेचे कर्जाची सर्व रक्कम भरली असतानाही पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर यांचे कडे कलम 101 नुसार तक्रारदार यांचे कडुन वसुली ची कारवाई करणेचे आदेश मिळणेकरिता प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला होता. तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला म्हणून त्याचे मोबदल्यात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे आज रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान  1,00,000/- ची मागणी करून तडजोड अंती 50,000 रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष करुन आज रोजी कायनेटिक चौक येथील होटेल जस्ट ईन अव्हेन्यु मध्ये आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम 50,000 रुपये स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नाशिकचे एसबीचे अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक सोनवणे व वाचक पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment