हत्या प्रकरणात सहभाग नाही ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 12, 2021

हत्या प्रकरणात सहभाग नाही !

 हत्या प्रकरणात सहभाग नाही !

ना. प्राजक्त तनपुरेकडून कै.दातिर कुटुंबाचे सांत्वन...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पत्रकार कै.रोहिदास दातीर यांच्या हत्येचा तपास पारदर्शक होईल आणि कोणाच्याही दबावात होणार नाही.एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाची निर्घृण हत्या होणे आणि गुन्हेगारांना साथ देणे म्हणजे मानवतेला काळीमा फासण्यासारखे आहे.त्यामुळे तनपुरे कुटुंब कधीच अशा गोष्टीला समर्थन करणार नाही,आम्ही वैयक्तिक लक्ष घालुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि दुःखंकीत कुटुंबाला न्याय व आमचा सच्चा कार्यकर्ता कै.दातीर यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. अशी भावनिक प्रतिक्रिया ना.श्री.प्राजक्त तनपुरे यांनी मयत दातिर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले असता दिली.
राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात तनपुरे घराण्याचा काडीमात्र संबंध नाही, आमच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तात्काळ पोलिसांना द्यावेत, लवकरच पोलिस तपासात खरे काय ते समोर येईलच अस म्हणत माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी केलेल्या सर्व आरोपाचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी खंडन केले.
पत्रकार रोहिदास दातीर यांची 6 एप्रिल रोजी शहरातून अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर हत्या ही 18 एकर जागेच्या वादातुन झाली असल्याचा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. ती जागा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मेहुणे यांची आहे तर त्यास मुलगा सोहम प्रापर्टि चे नाव देखील आहे. आणि याच प्रापर्टीतून दातीर यांची हत्या झाली आहे. म्हणून त्या हत्यामागे नामदार प्राजक्त तनपुरेंचा देखील हात आहे असा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी केला आहे. या सर्व आरोपाचे खंडन करताना ना.तनपुरे म्हणाले की, डॉ.तनपुरे शिक्षण संस्थेने 1 99 2 साली ती जागा खरेदी केलेली आहे. उतार्‍यावर डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे शिक्षण संस्था असे नाव देखील आहे. उतार्‍यावरती जुन्या नोंदी देखील आढळून येतात. त्याचबरोबर माझ्या मुलाच्या नावाचा देखील उल्लेख कर्डिलेंनी केला तर माझा मुलगा 14 वर्षाचा आहे. तो कुठहीही व्यवहार पहात नाही.
कै.दातीर यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक राजकीय नेत्यांना घाम फोडला परंतु त्यांची लेखणी कधीही तनपुरे कुटुंबाकडे वळली नाही.मुळात दातीर यांचेच तनपुरे कुटुंबावर नितांत निष्ठा आणि प्रेम होते. आपण असल्या गुन्हेगार वृत्तीला खतपाणी घालणार नाही याची खात्री आहे परंतु दातीर कुटुंबाला न्याय देणे,दहशती खाली जगणार्‍या कुटुंबाचे मनोबल वाढवून न्यायासाठी शाश्वत करणे,गुन्हेगार कितीही मोठे असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर संपुर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.अशा तीव्र भावना तेथे उपस्थित असलेल्या धनगर समाजातील नेत्यांनी नामदार प्राजक्तदादा यांच्यापुढे मांडल्या.यावेळी यशवंत सेना जिल्हाअध्यक्ष श्री.विजय तमनर,अहिल्यादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री.दत्ता खेडेकर,श्री.दादाभाऊ तमनर,श्री.भारत मतकर,श्री.श्रीकांत बाचकर,श्री.संतोष बोरुडे,कुरणवाडीचे सरपंच आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहम  प्रॉपर्टी माझ्या मेव्हण्याची आहे. त्यांची त्यात भागीदारी आहे. त्यांनी काय व्यवसाय करावा हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या व्यवसायात मी लक्ष घालत नाही. तरीसी मी सर्व कागदपत्रे आपल्याला दाखवली की रोहिदास दातीर यांचा सोहम प्रॉपर्टी बद्दल कधीच कुठला वाद नव्हता. दातीर यांचा त्या 18 एकरातील काही भागातील पठारे व्यक्तीबरोबर वाद होता. त्यात त्यांचा समझोता देखील झाल्याचे कागदपत्रे आहेत. त्यामुळे त्याचा संबंध सोहम प्रापर्टिशी जोडने अन् आमच्याशी जोडने याचा कुठेच संबध नाही आरक्षणाबाबत कुठलाही विषय असला तर नगरपालिकेत त्याचा ठराव होतो. हा विषय नगरपालिकेपुढे आल्यानंतर हे आरक्षण आपल्याला विकसित करायचे आहे असा शेवटचा ठराव 2020 साली झाला आहे. पत्रकार रोहिदास दातीर आणि कान्हू मोरे या दोघांनाही मी ओळखत होतो . दोघांशीही माझे चांगले संबंध होते. तसेच पोलिस तपासात लवकरच योग्य ते समोर येणार आहे. त्यामुळे उगाच आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी माझ्यासारख्या निष्कलांकित माणसावर बिनबुडाचे आरोप शिवाजीराव कर्डिलेंनी करू नये कुठल्याही मुद्यावर राजकारण करावे ही त्यांची जुनी सवय आहे आपल्याला राजकारणाची खूप हौस असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोलावं आमच्यावर बिनबुडाचे आरोप करू नये. - ना. प्राजक्त तनपुरे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here