‘लिफ्ट’ मागुन लुटणारी महिला तोफखाना ‘डीबी’ ने पकडली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

‘लिफ्ट’ मागुन लुटणारी महिला तोफखाना ‘डीबी’ ने पकडली.

 ‘लिफ्ट’ मागुन लुटणारी महिला तोफखाना ‘डीबी’ ने पकडली.

लिफ्ट का बहाना.. कही लुट न जाना..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रमुख रस्त्यांवर आपण प्रवास करीत असताना कोणी लिफ्ट मागितली तर सावधान.. दिल्लीगेट एमआयडिसी रस्त्यावर टेम्पो चालक, टू व्हीलर स्वारांना ‘लिफ्ट’ मागून लुटणार्‍या एका महिलेला तोफखाना ‘डीबी’ पथकाने सापळा लावून पकडून गुन्हा दाखल केलाय. “वो बुलाती है.. मगर जाने का नही, लिफ्ट मांगती है रुकने का नही.. असा सावधानतेचा इशारा यावेळी नागरिकांना देण्याची गरज आहे. सुनिता भाऊसाहेब भगत वय 43 वर्षे रा.काळे वस्ती,जेऊर या महिलेच्या विरोधात विजय किसन चौधरी व 51, टेम्पो ड्रायव्हर, मिस्किन मळा. सिव्हील हडको यांनी फिर्याद दिली आहे.

टेम्पो चालक विजय किसन चौधरी यांनी तोफखाना ‘डीबी’ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्याकडे माझ्या स्वतःचा मालकीचा मालवाहू टेम्पो नं-एम एच-16 क्यु-1594 हा असून तो मी स्वतः चालवतो. व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. दि. 13/04/2021 रोजी 12:45 वा सुमारास मी माझ्या टेम्पोमध्ये फर्निचर सामान घेऊन नगर मनमाड रोड ने एमआयडीसी अहमदनगर येथे जात असताना झोपडी कॅन्टींग समोर टी.व्ही.एस शोरूम जवळ 40 ते 45 वर्षांची महिला पांढर्‍या रंगाचा प्रोन घालून उभी होती. मी सदर महिलेच्या पुढे दहा फुटावर माजी मालवाहतूक गाडी पाणी पिण्यासाठी उभी केली असता. त्या वेळी लगेच त्या ठिकाणी उभे असलेली महिला लगेच माझ्या गाडी जवळ आली व मला म्हणाली मला हुंडेकरी शोरूम पर्यंत सोडा. तेव्हा माझ्या गाडीत पाठीमागे माल असल्यामुळे मी तिला माझ्या पुढच्या सीटवर बसवले व तिला हुंडेकरी शोरूम जवळ गेल्यानंतर तिला म्हणालो. आता तुम्ही उतरा असे म्हटल्यावर ती मला म्हणाली मी कोणाच्या गाडीत फुकट येत नाही. असे म्हणून तिने मला 500 रुपयाची नोट दाखवली, तेव्हा मी म्हणालो माझ्याकडे 500 रुपयांचे सुट्टे नाहीत. त्यावर ती मला म्हणाली माझ्याकडील 200 रुपये च्या 3 नोटा घे व मला 580 रुपये मागे दे तेव्हा मी तिला म्हणालो हा कोणता हिशोब आहे. मला काही सांगू नको मला माझ्या गाडी भाड्याचे 20 रुपये दे.असे मी तिला म्हणाल्यावर ती मला म्हणाली मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. मी कोर्टात क्लास वन अधिकारी आहे असे म्हणून ती  माझ्या मालवाहतूक टेम्पो सह डॉन बॉस्को पुलापर्यंत माझ्या सोबत हुज्जत घालीत आली.
दुपारी 1 वा सुमारास डॉन बॉस्को पुलाजवळ मला तिने टेम्पो साईटला घेण्यास सांगितला असता मी डॉन बॉस्को पुलाजवळ टेम्पो साईडला घेतला तेव्हा ती मला म्हणाली तुझ्याकडचे सगळे पैसे मला दे नाहीतर मी तुला मारीन असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. व मी फोन केला तर पाच मिनिटात माझे लोक येतील. तुला मारतील असे म्हटल्यामुळे मी घाबरलो व माझ्याकडे असलेले 1700 रुपये त्यामध्ये 500 च्या 2 नोटा व 100 च्या 4 व 50 चे 4 नोटा 20 च्या 3 नोटा व 10 च्या 4 नोटा अशी रक्कम तिने बळजबरीने माझ्या हातातील पाकिटा मधून काढून घेतली. व ती गाडीतून उतरून निघून गेली. त्यानंतर मी पोलिस स्टेशनला आलो.  घडला प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार हे तात्काळ नगर मनमाड रोडने गेले असता झोपडी कॅन्टींग च्या आसपास ती महिला पोलिसांना मिळून आली व पोलीस तिला पोलीस स्टेशनला घेऊन आले. तेव्हा तिने पोलिसांना तिचे नाव सुनिता भाऊसाहेब भगत वय-43 वर्ष रा.काळे वस्ती, जेऊर ता जि अहमदनगर असे सांगितले.
माझ्या अगोदर शांतीलाल कपुरचंद भंडारी वय-65 वर्ष रा.आनंदनगर स्टेशन रोड अहमदनगर यांचेही ती मोटर सायकलला लिफ्ट मागून त्यांचे सोबत बसून जाऊन महावीर नगर, सावेडी त्यांच्याकडील 1500 रुपये काढून घेतल्याचे त्यांनी मला भेटल्यावर पोलीस स्टेशनला सांगितले. म्हणून माझी सदर महिलेविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे असेही फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here