विवाहास परवानगी... पण कपडे, भांडी, दागिने खरेदी कशी करणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 8, 2021

विवाहास परवानगी... पण कपडे, भांडी, दागिने खरेदी कशी करणार?

 विवाहास परवानगी... पण कपडे, भांडी, दागिने खरेदी कशी करणार?

दुकाने बंद असल्यामुळे जिल्ह्यातील वधु-वर पित्यांना पडलाय प्रश्न..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘लॉकडाऊन’ हा भयप्रद शब्द न वापरता ‘ब्रेक द चेन’ हा भुलरभुलैय्या राज्य शासनाने केला खरा पण ‘ब्रेक द चेन’चं पितळ आता उघडे पडू लागलय.. 50 जणांच्या उपस्थितीत विवाहास परवानगी दिली खरी, पण विवाहासाठी खरेदी करण्याची आवश्यकता आहे ती कपड्यांची, फर्निचरची, स्टील भांड्यांची, दागिने खरेदी करायची. पण जिल्ह्यातील सराफ बाजारासह सर्व दुकाने बंद आहेत. वधू-वर पित्यांनी विवाहाच्या तारखा नक्की केल्या आहेत. वधू-वर आनंदात आहेत, पण आता विवाहाची खरेदी कुठून करावी हा प्रश्न वधु-वर पित्यांना पडला आहे.
विवाह परवानगी नंतर दुसरा महत्त्वाचा विषय बांधकामाचा ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत खाजगी सरकारी बांधकामांना परवानगी आहे पण स्टील (लोखंड) सिमेंटची दुकाने बंद आहेत. मग बांधकाम कसे करणार हा प्रश्न आहे. शासनाने निर्बंध घालताना सारासार विचार केला नसल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here