वाढदिवसानिमित्त गरजुंना अन्नदान व कोव्हिड पेशंटसाठी मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

वाढदिवसानिमित्त गरजुंना अन्नदान व कोव्हिड पेशंटसाठी मदत

 वाढदिवसानिमित्त गरजुंना अन्नदान व कोव्हिड पेशंटसाठी मदत

सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे यांचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केडगांव मधील सामाजिक कार्यकर्ते व मराठा सोयरिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांचा काल वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेसही त्यांनी अहमदनगर मधील चितळे रोड येथे दुर्लक्षित घटकांना अन्नदान केले. ज्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही असे बरेच लोक समाजात आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. अशोक कुटे सर दरवर्षी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस सामाजीक जाणिव ठेवुन गोरगरीब गरजू लोकांना, अनाथ मुलांना मदत करून  ह्या पद्धतीने करतात.
तसेच सध्या कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड न मिळणे, , इंजेक्शन, प्लाझ्मा, व्हेंटिलेटर बेड न मिळणे, लाखातील बिले हे प्रश्न पाहून त्यांनी स्वतः विविध दवाखान्यात जावून कोव्हिड पेशंटची बिले कमी करुन दिली आहेत. तसेच शिक्षकनेते डॉक्टर संजय कळमकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कुटे सरांनी नगर मधील धूत हॉस्पिटलला भेट दिली.  धूत हॉस्पिटल चे अभ्यासू व्यवस्थापक डॉक्टर काळकुंभे सर, डॉक्टर महेश मुळे सर यांच्याशी कोरोना पेशंट बाबत चर्चा केली. तेथे त्यांनी बेड देण्याचा मानस व्यक्त केला. तसेच त्यांनी स्वतः इतर संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांना सोबत घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना च्या विविध प्रश्नावर निवेदनही दिले आहे.  गेल्या दहा दिवसांपूर्वीच कोव्हिड पेशंटचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आपत्कालीन मदत कार्य म्हणून व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. मराठा उद्योजक लॉबी, सकल मराठा समाज या संघटनेच्या माध्यमातून जिल्हानिहाय असे ग्रुप तयार केले आहेत.  कोव्हिड प्रश्नाबाबत जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्था, संघटना, सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment